पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


उपयोगी पडावें यांत नवल नाहीं. व यामुळेच रोगस्थानांत प्रतीकारी सामर्थ्य पुरें पडते.
 २ एकाद्या ठिकाणी रोगकारक द्रव्याचा जमाव होऊं लागला म्हणजे नित्याचे यांमध्ये ज्या पचनसामर्थ्याचा उपयोग व्हावयाचा त्याचा उपयोग न झाल्यानें तें शिल्लक राहते व रोगकारी द्रव्याचा कांहीं मर्यादेपावेतों संचय होतो त्या अवधीत शिलकी सामर्थ्याचीहि वाढ होते व शिलकेमुळे वाढलेले सामर्थ्य प्रतीकाराला समर्थ हार्ते.
 3 नित्य ज्यां क्रिया चालतात त्या स्थानी सामर्थ्याच्या सर्वांशाने चालत नसून त्याचे कांहीं अंशाने चालत असतात. व रोग होतो त्या वेळी त्याचा प्रतिकार रोगस्थानीय राखीव सामर्थ्याकडून होतो. एखाद्या विशेष प्रसंगी मनुष्य अचाट काम करतो. त्या कामाची कल्पनाहि नित्याचे अनुभवावरून असत नाहीं. वजन उचलणे, धावणे, अतर्क्य श्रम इत्यादि प्रसंगवशात् अनुभवास येतात. ज्याचे त्यालाही हैं सामर्थ्य समजत नाहीं अशा प्रकारची अनेक उदहरणे दृष्टी पडतात. यावरून शरीरांत अतर्क्य असे राखीव सामर्थ्य असतें हैं उघड होतें. व या राखीव सामर्थ्यामुळेच रोगप्रतीकार होऊं शकतो. ही राखीव सामर्थ्याची गंगाजळी जर वारंवार उपयोगांत आणिली तर ती रिकामी होऊन शरीर निकामी होते. जबरदस्त रोग असल्यास या सामर्थ्याचे उणेपणाने रोगावर त्याचा परिणाम न होतां नाश होतो व रोग असाध्य होतो.
 रोगप्रतीकारी सामर्थ्याविषयीं या तीनही कल्पनांचा समावेश शेवटच्याच कल्पनेत होतो; शारीरिक सामर्थ्य विशिष्टस्थानी एकवटणे, शिलकी सामर्थ्य उपयोगी पडणें याचा तात्पर्यार्थ शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या योजनेचा उपयोग होणें असाच होतो व अशी जी योजना तेंच शरीराचे विशिष्ट अगर राखीव सामर्थ्य होय या सामर्थ्यामुळे रोगाचा प्रतीकार सुरू होण्यापूर्वीचे अवस्थेला आयुर्वेदांत रोगाची

आमावस्था.

 असें नांव दिले आहे. ह्या अवस्थेमध्ये रोगकारक द्रव्य व अविकृत धातु यांमध्ये पृथकरणाची क्रिया सुरू झालेली असत नाहीं ती शरीराच्या विशिष्ट प्रतीकारी सामर्थ्याने सुरू होऊन रोगट भागाच्या पृथक्करणाच्या अवस्थेला

पच्यमानावस्था

 असे यथार्थ नांव दिले आहे. या अवस्थेत ज्या पचनशक्तीचे अनैसर्गिक कार्य सुरू होते तीमुळेच उष्णता, दाह इत्यादि पचनशक्तीची किंवा पित्ताचीं लक्षणें होतात व आरंभीचे केवळ संग्रहातिरे-