पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई


१०७
रोगप्रतीकारी सामर्थ्य कोठून उत्पन्न होतें ?

 काचें म्हणजे कफाचे स्वरूप जाऊन त्याचे मदतीला रोगनाशाचे दृष्टीनें इष्ट कां होईना पण रोगस्थानाला त्रासदायक या दृष्टीने रोगाला कफ व पित्त या दोन दोषांचं मिश्र स्वरूप येते. या अवस्थेला रोगाची संसर्गावस्था असे म्हणतात. अनैसर्गिक संग्रह आणि अनैसर्गिक पचन या दोन मुख्य क्रिया एकत्र त्रास देत असतात. संसर्गातील दोन दोषांची विकृती अशा स्वरूपाची असते. मात्र द्विदोषी विकार या अवस्थेला म्हणत नाहींत. दोन दोषांच्या क्रियावैषम्याचें उदाहरण ह्मणूनच वरील खुलासा केला आहे. द्विदोषी रोग हणजे उभय क्रिया- वैषम्यानेच रोगाला सुरुवात होणें असा अर्थ अभिप्रेत आहे. कारण कोणत्याही रोगाच्या आम, पच्यमान आणि पक्व अशा तीन अवस्था असावयाच्याच. मग उत्पादक क्रियावैषम्य एक दोषी असो अथवा अनेक दोषजन्य असो. संसर्ग व संनिपात हाणजे दोन व तीन दोषांच्या समकालीन क्रियावैषम्यामुळे उत्पन्न झालेले विकार. हे कसे होतात ?
 मागील उदाहरणांत ( सुजेचे ) उत्पादक मुख्य कारण संग्रहरूपी 'कफाच्या क्रियेचे वैषम्य सांगितले आहे. कल्पना करूं की एकाद्या ठिकाणी रक्तसंचय झाला, संग्रह कफाचा हाणून कफ हैं सामान्य कारण त्यांत आहेच. पण कफाचेच कारणाने सूज यावयाची ह्मणजे रक्तामध्ये स्निग्धता, घनता, इत्यादि गुण वाढलेले असावे लागतील आणि असल्या रक्ताचेंच अभिसरण न होणे स्वाभाविक असतें. एकच कफात्मक सूज या प्रकारची असेल, परंतु रोग्याचे आहारादिकांमध्ये जर कफकारक आणि बिदाहि असले पदार्थ असतील व त्यामुळे तयार होगारा रसधातु व रक्त यांमध्ये स्निग्धता, गुरुता, घनता इत्यादि कफ- गुणांबरोबरच बिदाह ( जळजळणे, आग होणें, दाहक गुण) हा पित्त गुणहि असेल तर सुजल्या जागी सचित पदार्थात आरंभापासूनच कफाबरोबर पित्ताचीहि लक्षणे उत्पन्न होतील. अर्थातच हीं लक्षणें म्हणजे कफाची सुजल्या जागीं शीतता आणि पित्ताची उष्णता नव्हे. किंवा कफाची सुर्जेतील घनता आणि पित्ताची मृदुता असली विरोधी लक्षणे नव्हेत. कफामुळे सुजेवर पांडुरता आणि पित्तामुळे लाली एकदम येणारी नाहीं हैं उघड आहे. व अशा प्रकारची कल्पनाही संसर्गाविषयी आयुर्वेदाची नाहीं. सूज उत्पन्न करणाऱ्या रक्तसंचयामध्ये संग्रहकारी घनता आणि विदाहकारी बिदग्धता या दोन रक्ताच्या अनैसर्गिक दुर्गुणांचा बोध व्हावा यासाठी सूज कफपित्तात्मक आहे अशी संसर्गविषयक शास्त्रीय भाषा ठरविली आहे. चिकित्सेला या परिभाषेची अवश्यकता असते. सूज किंवा संचय घालविण्यासाठी अंतर्बाह्य जे उपाय करावयाचे त्यांमध्ये केवळ कफावर उष्णवीर्य असे उपचार पण कफपित्त असें संसर्गी स्वरूप असतां उपचार संचय घालविणारे पण