पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 अविदाही असे असावे लागतात. व यासाठींच क्रियावैपम्यांतील सूक्ष्म भेद दाखविण्यासाठी संसर्गाची कल्पना आहे. या संसर्गाचे प्रकार सांगितले आहेत त्यांमध्ये असेंच धोरण आहे कीं संसर्ग असतांही या दोन दोषांमध्ये अधिक विकृति कोणत्या दोषाची. ज्याची विकृति अधिक असते त्याचा उल्लेख आधी केला जातो, असा सामान्य नियम आहे. जसें,
१ वातपित्त. २ वातकफ. ३ ‍पित्तकफ; हे तीन प्रकार संसर्गाचे मुख्य होत. यांमध्ये दाखविलेले दोन दोषांची विकृति समप्रमाणांत असते अशी कल्पना स्विकारली आहे. अर्थातच संसर्गातील दोषांचे विकृतीमध्ये नेहमीच सारखेपणा असणें असंभाव्य आहे. ह्मणजे दोन दोषांची विकृति आणि त्यांतील कमी अधिकपणा दाखविणारे भेदही संभवतात. आणि प्रत्येक जोडींतील दोन दोषांच्या अधिक्यावरून प्रत्येकीं दोन प्रकार याप्रमाणे संभवतात.

 जसे एकदां १ वाताधिक वातपित्त व २ पित्ताधिक वातपित्त या अवस्थांचे- आधिक्याचे बोधक शब्द योजावयास पाहिजेत. याप्रमाणे वाताधिक वातकफ व कफाधिक - वातकफ आणि पित्ताधिक पित्तकफ व कफाधिक पित्तकफ असे तारतम्यमूलक संसर्गाचे सहा प्रकार व पहिले समविकृतीचे तीन एकून नऊ प्रकार सांगितले आहेत.

विद्धि संसगंस्त्रिधा तत्रतु तान्नव ।
त्रीनेव समया वृद्धया पडेकस्यातिशायने ॥ ( अ० ह० )


 ( संसर्ग तीन प्रकारचा व त्यांत एकंदर नऊ दोषभेद होतात. दोन दोषांच्या समप्रमाण वाढीने तीन व एकाचे आधिक्याने सहा या प्रमाणे. )
 ही तारतम्य कल्पना चिकीत्सेंतील उपचारगुणांचे तारतम्यासाठी पाहिजे.

_______
संनिपात.

 संनिपात ह्मणजे तीनहि दोषांची एकसमयावच्छेदानें विकृति. परस्परविरोधी गुणांचा संसर्ग ज्याप्रमाणे त्यांच्या क्रियावैषम्याच्या प्रत्येक गुणाचा नव्हे त्याचप्रमाणें संनिपात ह्मणजे देखील परस्पर विरुद्ध गुणांच्या तीन दोषांचे संमेलन नव्हे. ज्याप्रमाणे संसर्ग होणजे दोन क्रियांमध्ये समकाली विषमता त्याचप्रमाणे संनिपात ह्मणजे शरिराच्या तीनहि क्रियांमध्ये एकदम विषमता येणे. ही विषमता कशी येते पाहू.
 कोणत्याहि ठिकाणी शरीराचे एका कोणत्या तरी क्रियेत विषमता