पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११३
आम

 यावरून सदैव सर्व शरीरांत फेंकल्या जाणाऱ्या रसधातूचें अपचन ऊष्म्याच्या ह्मणजे स्थानी पाचक शक्तीच्या ' अल्पबलत्वानें ' झालें असतां त्याला आम म्हणतां येईल व ज्या ठिकाणी असला आम दुष्ट होतो तेथें रोग होतो. आम अन्न ज्यांत असते असा आशय ह्मणजे आमाशय ( अन्नाशय ) ज्यांत अन्नावर पूर्णपण पचन संस्कार झाले नसतात अशा आशयाला हाणजे पच्यमानाशय किंवा लध्यंत्र यालाहि नांव आमाशय दिले आहे.
 ( ही दोन स्थानें अनुक्रमें कफ व पित्त यांची आहेत ). त्यापुढें आमरसाचें स्थान म्हणून यकृतालाहि आमाशय हें नांव आहे. (आमाशयाश्रयं पित्तं रंजकं रसरंजनात् ) या नांवांचा विचार करतां पुढील अवस्थेचे तुलनेने येणाऱ्या पक्वावस्थेची जी पोषक पदार्थाची पूर्वावस्था- पचनसंस्काराची पूर्वावस्था तिला आम आणि त्याचे स्थानाला आमाशय अशी आम आणि आमाशय यांची व्यापक व्याख्या स्वीकारली आहे असें दिसतें. मग आमाशय या शब्दानें प्रत्येक धातूचें आद्य स्वरूप कां घेऊं नये ? पोषक रसाचा स्वीकार करून नंतर त्याला आत्मसात् करावयाचा हा धातूंचा नित्य व्यापार. त्यांत जर सात्य करण्याची क्रिया मंदावली तर रोज हैं सात्मीकरण ज्या धातूंकडून होतें तेहि या अर्थानें आमाशयच होत. धात्वग्नीचें वर्णनावरून धातूंच्या या क्रियासातत्याची आयुर्वेदाने योग्य कल्पना दिली आहे. त्याचप्रमाणे धातु हे नेहेमीं तीन अवस्थांमध्ये असतात असे वर्णन करूनहि याच तत्वाचा खुलासा केला आहे.

'स्थूलसूक्ष्ममलैः सर्वे भिद्यंते धातवस्त्रिधा ।
स्वः स्थूलोऽशः परं सूक्ष्मस्तन्मलं याति तन्मलः ॥ १ ॥

( डलुगाचार्य ).


  यावरून पाहतां आम व आमाशय यांचा व्यापक अर्थ स्वीकारल्यास त्याने प्रत्येक धातूचाहि उल्लेख होऊ शकतो. व अर्थाची अशी व्याप्ति अथवा अतिव्याप्ति स्वीकारण्याचे कारण निदानशास्त्रामध्ये यथार्थ बोध व्हावा हें आहे.

 रोगाः सर्वेपि मंदेंग्नौ । अग्निमूलं बलं पुंसां ।
 इत्यादि वाक्यांत पचनाचें सांगितलेलें महत्व हे केवळ जठराइतकेंच मर्यादित नाही. जठराग्नीचे कार्य सुरळीत चालू असतांहि रसाचें यकृतांत व रसवाहिनीत पचन नाहीं यामुळे राजयक्ष्मा होतो. रसपचन सर्व शरीरांत असतांहि सूज, ग्रंथि, अर्बुद इत्यादि स्थानी विकार होतात. यावरून अग्निमांद्यामुळे सर्व प्रकारचे रोग होऊं शकतात. पण या सामान्य स्वरूपाचे नियमापेक्षां कोणत्याहि भागांत रोग व्हावयाचा