पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 म्हणजे तेथील पचनशक्ति कमी झालेली असते असा सामान्य सिद्धांतच अधिक बोधक होईल. मग हें ऊष्म्याचें ह्मणजे पचनशक्तीचें 'अल्पबलव' तत्वतः कमी झालेले असेल अथवा फाजील संचयाला अपुरे पडत असेल पण रोग व अपाचित रस यांचें नित्य साहचर्य किंवा व्याप्ति आहे, हाच अर्थ आमाचे व्याख्येत अभिप्रेत असून मह- त्वाचा आहे. आद्य रसधातु म्हणजे पोषक असा हा रस होय. आयु- र्वेदीय ग्रंथांत अशा प्रकारचा आमाशयाचा अर्थ कांहीं ठिकाणी स्वीका- रला आहे सुश्रुतामध्ये विषमज्वराची उपपत्ती सांगतांनाः--

अहोरात्रादहोरात्रास्त्थानात्स्थानं प्रपद्यते ।
ततश्चामाशयं प्राप्य करोति विषमज्वरम् ॥ १ ॥

सुन उ० स्था० अ० ३९. एकेक दिवसाने एकेका स्थानांत प्रवेश करून आमाशयांत येतो व [ दोष ] विषमज्वर करतो. यांत आमाशय हा शब्द अन्नाशय किंवा पच्यमानाशय या अर्थी योजलेला नाहीं. कारण, विषमज्वर आणि इतर ज्वर यांतील मुख्य अंतर म्हणजे इतर ज्वर हे आमाशया ( लध्वंत्रा ) चे बिघाडामुळे उत्पन्न होतात तसे विषमज्वर नाहीत. विषमज्वरांत आमाशयाची विकृति नसते हे त्यांचे संप्राप्तीमध्ये स्पष्टपणे सांगितलें आहे. दोपोऽल्पोऽतिसंभूतो ज्वरोत्सृष्टस्य वा पुनः । धातुमन्यतमं प्राप्य करोति विषमज्वरम् ॥ १ ॥ मा० नि० ज्वर गेल्यावर किंवा आरंभींच एकाद्या धातूमध्ये असणाऱ्या विकृतीनें विषमज्वर होतो. आणि इतर ज्वरांमध्ये- दोपा ह्यामाशयाश्रयः ॥ आमाशयाश्रयी दोष ज्वर उत्पन्न करतात असा उल्लेख आहे. असा फरक असल्यानें व पिमज्वराचे पांच प्रकार-- संततं रसरक्तस्यः सोऽन्येद्युः पिशिताश्रितः । मेदोगतस्तृतीयद्वित्वस्थिमज्जगतः पुनः ॥ १ ॥ कुर्याच्चतुर्थकं घोरं । रसाश्रयी दोषानें संतत, दोष रक्ताश्रयी असतां सतत, तो मांसधातूचे आश्रयाने असतां अन्शुष्क, मेदोवाल श्रयी दोषानें तृतीयक आणि अस्थिमज्जागत दोषानें चातुर्थिक उअर उत्पन्न होतो असे वर्णन आहे. यावरून या विषमज्वरांचा आमाशयाशी संबंध असत नाहीं हैं उघड आहे. मग हा उवर कसा येतो याचा खुलासा करीत असतां ' आमा- शयं प्राप्य ' म्हणून सांगितलेला हा आमाशय निराळ्या अर्थानें सांगि-