पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११५
एक दोषी विकार.

 तला असला पाहिजे हैं ओघानेच ठरते. व या ठिकाणीं आमाशयाचा अर्थ आम किंवा अपाचित असा अन्यतम धातु हाच अर्थ अभिप्रेत असावयास पाहिजे हैं निर्विवाद सिद्ध होतें.
 या सर्व खुलाशावरून आम या शब्दाने केवळ पचनेंद्रियांतील अन्नरस येवढाच अर्थ नसून कोणत्याही शारीरपदार्थाची आमावस्था असाच अर्थ निष्पन्न होत आहे. व त्याच अर्थाने निदानशास्त्रामध्ये त्याचा योग्य व्यवहार होऊं शकतो. स्थानी पचनशक्तीला म्हणजे पाचकपित्ताला किंवा पाचकअणुसमुदायाला ज्यावेळी पोषकपदार्थ आत्मसात् करण्याचे कामी अशक्तता येते त्यावेळी त्या अपाचित पदार्थाचा फाजील संचय अभिसरणाचे व परंपरेनें शरीरधातूंचे उत्पादनक्रियेचे सततकार्यांत अंतराय उत्पन्न करून विविध रोगांचा उत्पादक होतो. यालाच आम अशी संज्ञा आहे. अशा प्रकारच्या आमाचा संचय झाल्यावर नैसर्गिक क्रमाला अनुसरून त्यांचे पचन होते व मल किंवा टाकाऊ भाग शरीराबाहेर फेकला जाऊन पुन सर्व व्यापार सुरळीत चालू होतात. या अवस्थेला निरोगी अवस्था आली असे मानण्यांत येते. अशा रीतीने क्रमशः तीन अवस्था भोगणा-या रोगोत्पादक दूषित द्रव्याला- किंवा आमाला -

एक दोषी विकार.

 समजण्यांत येते. पण हा क्रम सोडून ज्यावेळीं अतित्वरित सर्वच क्रियांमध्ये बिघाड होतो, एकाद्या अथवा अनेक शरीरभागांत एकदम बिघाड होतो त्यावेळीं असला त्वरित बिघाड घडविणारे द्रव्य कोणतें व तें कसें तयार होते ? आशुकारी म्हणजे ज्याची उत्पत्ति व वाढ अतित्वरित होते असे विकार होतात ही गोष्ट खरी. अर्थात् उत्पादक कारण तीव्र असले पाहिजे. व आमाची म्हणजे रोगोत्पादक दूषित द्रव्याची वरील व्याख्या या विकारांचें उत्पादक कारण या दृष्टीनें अपुरीच ठरणार आणि ह्मणूनच या आमाचे व्याख्येबरोबरच दुसरीहि व्याख्या दिली आहे ती अशी:--

अन्ये दोषेभ्य एवातिदुषेभ्योऽन्योन्यमूच्र्छनात् ॥
कोद्रवेभ्यो विपस्येव वर्द्त्यामस्य संभवम् ॥ १ ॥ [अ०ह० ]


  अत्यंत दुष्ट अशा दोषांच्या परस्परमिश्रणापासून कोद्रव नांवाच्या (हरीक ) धान्यापासून विष उत्पन्न होतें त्याप्रमाणें आमाची उत्पत्ति होते. या व्याख्येमध्ये आम म्हणजे शाररिपदार्थांच्या अव्यवस्थित अनैसर्गिक मिश्रणापासून- तयार झालेले- विषारी द्रव्य असा अभिप्रायार्थ आहे. व्यावहारिक भाषेत या व्याख्येचा तात्पर्यार्थ.