पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
आयुर्वेदातील मूलतत्वें.



विषारी अथवा विनाशक द्रव्य.

 असा करता येईल. हैं द्रव्य शरीराचें पोषण करीत नाहींच पण ज्या ठिकाणी त्याची उत्पत्ति व वाढ झाली असेल तेथील शरीरधातु आपल्या विषारी गुणनें दूषित करतें व शरीरामध्ये एक प्रकारची विनाशक किंवा विध्वंसक क्रिया सुरू होते. अशी अवस्था जेथे सुरू होते त्या जागी या तिव्र व विषारी आमानें स्वाभाविकतयाच नित्य व्यापारांत एकदम व्यत्यय येतो, आमद्रव्याच्या विषारी तीव्रतेनें ज्या ठिकाणीं क्षोभ उत्पन्न होतो तेथें कफ पित्त आणि वायु यांच्या अनुक्रमें संयोजन, विभाजन आणि वियोजन या क्रिया घडत नाहींत व या करतांच अशा तीव्र आमजन्य.

समकालीन क्रियावैषम्याला

 सन्निपात असें नांव आहे. अशा रीतीनेच त्रिदोषप्रकोप होऊ शकतो. सृष्टीतील पदार्थांमध्ये असलेल्या विचित्र गुणांमुळे दोषप्रकोपाचे अनेक प्रकार संभवतात. व अशा प्रकारचे विकृतीभेदांचे वर्गीकरण करीत असतां त्यांतील हे प्रमुख तीन प्रकार ह्मणजे, एकदोषी, द्विदोषी किंवा संसर्गजन्य आणि त्रिदोषी अथवा सांनिपातिक है होत. या तीनही प्रकारांत स्थानभेदानुसार एक, दोन आणि तीन या क्रियांचे वैषम्य पहावयाचें असतें. एकदोषी विकृती तीन प्रकारची १ वातिक २ पैत्तिक ३ श्लैष्मिक यांचे व्यावहारिक अर्थ ह्मणजे संयोजन क्रियेतील विकृति, पचनक्रियेतील विकृति आणि उत्सर्जनक्रियेताल विकृति असे आहेत. आणि शास्त्रीय भाषेत या अर्थाचा निर्देश, अनुक्रमें अभिष्यंद, अभिताप आणि क्षोभ या शब्दांनी केला जातो.
 विकारांमध्ये एक वर्ग असा की ज्यामध्ये वरील प्रकार अनुक्रमें घडावेत व दुसरा असा की ज्यामध्ये हा सामान्य नियम नाहीं. याचें कारण रोगोत्पादक पदार्थांचे विशिष्टगुणकारित्व असतें. ( प्रभाव ) एकाद्याच्या विकारांत प्रथम अभिष्यंद ( वाढलेल्या पदार्थाने सूक्ष्म स्त्रोतसे बंद होऊन एक प्रकारचा ओलसरपणा-सुजीरपणा येणे. अनैसर्गिक -संग्रह-संयोग. ) सुरू होऊन त्यानंतर अभिताप व क्षोभ होईल. तर एकाद्या विकारांत आरंभीच तीक्ष्ण, उष्ण, विदाही (दाहक) असल्या पदार्थांमुळे अभिताप ( अतिरिक्त उष्णतेमुळे एखाद्या ठिकाणी दाह- असह्य दाह होणें ) उत्पन्न होईल व त्यामुळे अपरिचित दाहानें संकुचित झालेल्या स्रोतसांतून योग्य उत्सर्जन झालें नाहीं हाणजे अर्थातच शिल्लक राहिलेल्या अनुत्सर्जित पदार्थाचा संचय व त्यामुळे अभिष्यंद. आणि कांहीं विकारांत ज्ञानतंतूचे क्षोभामुळे एखाद्या ठिकाणीं