पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७
विषारी अथवा विनाशक द्रव्य.

 आरंभी क्षोभ व नंतर इतर क्रिया होतात. ( असल्या शुद्ध क्षोभांत संचय व अभिताप यांचा संभव असत नाहीं. या अवस्थेला शुद्ध वायूचे विकार ह्मणतात. इतर वेळी ह्मणजे अभिष्यंदांत स्रोत निरोधानें आणि अभितापांत स्रोतःसंकोचनामुळे उत्सर्जन क्रियेत व्यत्यय येऊन अवरुद्ध वायूचा त्या जागीं फाजील ताण किंवा दाब शूल वगैरे लक्षणें उत्पन्न करतो. अर्थात् हा क्षोभ खरा व विकृतीही वायूची पण केवळ वायूची नव्हे. आवृत किंवा मिश्र वायूची व अशा विकृतीत अभिष्यंदांत कफार्शी व अभितापांत पित्ताशी वायूचीं लक्षणें संयुक्त असतात. 'योगवाहः परं वायु : ' हैं वाक्य याच अवस्थेचें बोधक आहे. वायूचे वर्णनांत याचा खुलासा आहेच. ) अशा रीतीनें रोगोत्पादक कारणांचे गुणविशेषानुसार होणान्या विकृतीचे स्वरूपावरून त्याचे तारतम्य ठरवावयाचें. एकदोषी विकृतीमध्ये कदाचित् कांहीं कालाने आमाला तीन आमाचे किंवा विषारी आमाचें स्वरूप येणें संभवनीय असतें व तसे आल्यावर त्याच विकृतीला सांनिपातिक नांवाने ओळखून चिकित्सेचें धोरण बदलावें लागतें. मिश्र दोषांची विकृती ह्मणजे त्यांमध्ये आरंभापासूनच दोन क्रियांची दुष्टि व सांनिपातिक ह्मणजे विनाशक आमद्रव्याने उत्पन्न केलेले समकालीन तीन क्रियांतील वैषम्य हे यावरून ध्यानी येईल. या सांनिपातिक विकृतीमध्येही पोटभेद आहेतच. हे पोटभेद म्हणजे शारीरिक तीन क्रियांचे विकृतीतील तारतम्य दाखविणारे असतात. असे प्रकार तेरा सांगितले आहेत. ते असे:--
 १ वाताधिक २ पित्ताधिक ३ कफाधिक ४ वातपित्ताधिक ५ पित्तकफाधिक ६ कफवाताधिक. या सहा प्रकारांमधे सांनिपातिक विकृतीतही अधिकांत अधिक एका क्रियेची विकृती व त्याचप्रमाणे दोन क्रियांची अधिक विकृती व त्या मानाने इतर कमी विकृत असे हें तारतम्य आहे. याहूनही अधिक सूक्ष्म फरक दाखविणारे आणखी सहा प्रकार असे कल्पिले आहेत की त्यांमध्ये एकाहून एक अधिक विकृत ह्मणजे तरतमभावदर्शक अर्थात् तीन दोष व त्यांपैकी प्रत्येक एकदां तरभावदर्शक व एकदां तमभावदर्शक अशा रीतीनें प्रत्येक दोन अवस्था किंवा विकृत मर्यादा दाखविणारे मिळून सहा होतात. जसें १ वायूहून पित्त व वित्ताहून कफ विकृत २ पित्ताहून कफ व कफाहून वायु विकृत. ३ कफाहून वायु व त्याहून पित्त विकृत. ४ वायूहून व त्याहून पित्त वाढलेले. ५ पित्ताहून वायु व त्याहून कफ विकृत. ६ कफाहून पित्त व त्याहून वायु विकृत. असे हे प्रकार १२ व तेरावा प्रकार ह्मणजे:-