पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
आयुर्वेदांतील मूळतत्वें.



सर्वांचा सर्वांगीण प्रकोप होय.

 या तारतम्यदर्शक प्रकारांचा उपयोग चिकित्सेसाठी महत्वाचा आहे. त्रिदोषांची भाषा म्हणजे कांहीं तरी गूढ, अचिंतनीय असे मानल्यास किंवा कांहीं तरी कल्पना म्हणून उपेक्षा केल्यास हे प्रकार म्हणजे कांहीं तरी वर्णन वाटेल आणि त्यांचा रोगाचे सूक्ष्म आणि चिकित्सोपयागी ज्ञानाला विशेष उपयोगहि हाणार नाहीं. पण त्रिदोषांचें तात्विक स्वरूप ध्यांनी घेतल्यास या वर्णनाचे महत्त्व ध्यानी येईल. " अविकृतावस्थेतील उपयुक्त वायुचें कार्य उत्सर्जन, त्याचें विकृत व रोगकारी स्वरूप क्षोभपित्ताचें अविकृतावस्थेतील उष्णतामुलक जें पचनाचें कार्य त्याचें विकृत व रोगोत्पादक स्वरूप अनिताप आणि संयोजन या कफाचे अविकृत कार्याचें विकृत स्वरूप अभिष्यंद हीं त्रिदोषांची विकृत स्वरूपें प्रथम ध्यानी घेऊन या तीनहि विकृतींचा संभव आहे अशी संनिपातिक अवस्था एकाद्या रोगांत असतां, या तिहींतून प्राबल्य कोणाचे याचा विचार अवश्य असतो. कफाधिक संनिपात म्हणजे अभिष्यंद इतरांहून अधिक, पित्ताधिक म्हणजे अमिताप अधिक व इतर त्या मानाने कमी त्याचप्रमाणे ककपित्ताविक अभिष्यंद आणि अभिताप अधिक असलेला संनिपात आणि यांतहि तारतम्य म्हणजे अभिष्यंद आहेच अभिताप त्याहून व त्याहूनहि क्षोभ अशा प्रकारची सूक्ष्म अवस्थांतरें या प्रकारांवरून विचारांत घ्यावयाची असतात. प्रत्येक रोगामध्यें अधिक त्रासदायक व आद्य उत्पादक विकृतीवर प्रामुख्याने उपचार करावयाचे असतात, (यं दोपमधिकं पश्येत्तस्यादौ प्रतिकारयेत् ॥ ) अ० ह० याच विकृतिभेदाला अनुसरून रोगांत कमी अधिक लक्षणे असतात, आणि या लक्षणांवरून रोगोत्पादक विकृतीचे स्वरूप ठरवावयाचें असतें. ( लक्ष्यते अनेनइतिलक्षण ज्याने रोग समजतो तें) प्रत्येक रोगामध्ये लक्षणें विविध असली तरी अभिष्यंद अभिताप आणि क्षोभ यांपैकी--एक दोन अथवा तीनहि क्रियांचे विकृति भेदानुसार व बलाबलाला अनुसरून असतात. केवळ शास्त्रीय किंवा कल्पनीय असे भेद आणखीहि पाडतां येतील. पण रोगज्ञानांत इतकें सूक्ष्म ज्ञान कठीण असतें यासाठी वरील तेरा प्रकार सांगीतले आहेत. शेवटचा तेरावा प्रकार म्हणजे ज्यांत सर्वच क्रियावैषम्य हा प्रकार

असाध्य कोटीतला असतो.

 तीन पृथक् ( एकेकटे ), संसर्ग नऊ आणि तेरा संनिपात एकूण दोषांचे हे पंचवीस प्रकार रोगोत्पादक विकृतीचे याप्रमाणें बोधक आहेत. याच पद्धतीने आणखी इतकेच (२५) दोषांचे प्रकार संभवतील.