पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



त्रिदोषांचा शास्त्रीय व्यवहार.

 याप्रमाणें त्रिदोषांचें तात्विक स्वरूप व त्यांचा शरीराशी असलेला नित्य संबंध निश्चित झाल्यावर आयुर्वेदाच्या सर्व वाङ्मयांत त्यांचा या नांवानींच उल्लेख करण्याचा प्रचार सुरू झाला. एकाद्या ठिकाणी अभिष्यंद होऊन विकार झाला असेल अशावेळी रोगी भागांतील विकृतीचे बोधक पण संक्षिप्त परिभाषेत कफ चा विकार असे वर्णन होऊं लागलें. त्याचप्रमार्णे या दोषांचे सादृश्यावरून शरीर पदार्थाचेहि वर्गीकरण स्थूल मानाने करण्यांत येऊन साधारणपणे रोगांचें स्थूल वर्गीकरण केले आहे. मार्गे सांगीतल्याप्रमाणे शारीर पदार्थांपैकी तीन दोष सोडून दिले म्हणजे सात धातु आणि तीन मल एकूण दहा पदार्थ राहतात. ह्या दहांनां दृष्य असें नांव असल्याचें मार्गे सांगीतले आहेच. शरीर म्हणजे हे पदार्थ व ह्या पदार्थांमध्ये कर्तृत्वसंपन्न दोष हैं त्यांचे सामर्थ्य व या दोहोंच्या संयोग पासून घडतो तो जीवन व्यापार. या नित्य व्यापारामध्यें ज्यावेळीं वैषम्य येते त्याचवेळी रोग उत्पन्न होत असल्यानें ' रोगस्तु दोषवैषम्यं ' दोषांचे वैषम्य म्हणजे रोग होय अशी रोगाची सामान्य व्याख्या ठरविण्यांत आली. ज्या शरीरभागांत रोग झालेला असतो तेथे स्पष्टपणे दृश्य अशी विकृतिधातु म्हणजे शरीराचे स्थूल पदार्थ यांत झालेली असते. रक्त दूषित होणें, मांस बिघडणें, स्नायु जखडणे, मळाचा अवरोध होणे, सूज येणें, पचन न होणे, सांधे सुटणे इत्यादि रोग शरीराच्या दृश्य अशा पदार्थात म्हणजे सामान्यतः धातु अगर मळ यांत झालेले दिसतात. असे असतांहि सर्व रोगांचे कर्तृत्व दोषांकडेच दिले आहे. " दोषाएवहि सर्वेषां रोगाणामेककारणम् ॥ (अ० हृ० ) सर्व रोगांचें मुख्य कारण दोषच आहेत. " याचें कारण असें कीं, जरी दृश्य भागांत रोगट अवस्था दृग्गोचर होत असली तरी विकृति येण्याला दृश्य पदार्थांच्या सूक्ष्म आणि कार्यकारी भागांतच कांहीं तरी बिघाड होणें अवश्य असतें, आणि हा भाग म्हणजेच त्रिदोष समजावयाचे. कोणत्याहि प्रकारच्या अपथ्याचा परिणाम एकाद्या शरीर भागावर होतो म्हणजे त्या भागांतील शक्तिरूप भागावर होतो. जोपर्यंत ही शारीरपदार्थांची शक्ति- अर्थात् शक्तिसंपन्न पदार्थ म्हणजे दोष-संपन्न स्थितीत असतात तोपर्यंत अपथ्याचरणाचा कांहींच परिणाम होत नाहीं. आणि याचे उलट ही शक्ति कमी झाली असतां अल्पशा अपथ्याचाहि अनिष्ट परिणाम होतो. यावरून कोणत्याहि दृश्यविकाराचे उत्पादक कारण अंतर्गत सामर्थ्यसंपन्न असे अणु म्हणजे त्रिदोष हैं उघड होत आहे. व याच हेतूनें आयुर्वेदाच्या निदानशास्त्रांत त्रिदोषांचा सर्वत्र समावेश करण्यांत आला आहे. कोणत्याहि ठिकाणी विकार झालेला असो त्याचे मुळाशीं विकारी स्था-