पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 अथवा विकृतीचें ज्ञान या दोहोंनाहीं त्रिदोषविज्ञानाची अवश्यकता आहे. शरीरांत अनेक ठिकाणीं अनेक प्रकारच्या क्रिया घडत असतात. व प्रत्येक क्रियेच्या निष्पत्तीला योग्य असे निरनिराळे अवयव आणि आशय शरीरांत आहेत. तथापि आशयांत कर्तृत्व नाहीं, या आशयां- मध्ये जे विशिष्ट प्रकारचे पदार्थ सांठविले आहेत त्यांमुळे या क्रिया घडतात. अन्नाचा स्पर्श तोंडांत लाळ उत्पन्न करतो. त्याच अन्नस्पशनेिं अन्नाशयांत निराळ्या पदार्थाचा स्राव होतो. आंतड्यांत निराळा होतो. याचें कारण स्राववैशिष्ट्य. अर्थात् ज्या पदार्थामुळे हे स्राववैशिष्ट्य उत्पन्न झाले ते पदार्थच होत. असल्या पदार्थांचे पूर्वी सांगीतलेल्या वातादि दोषांशी साम्य पाहून ज्या दोषाचे जातीचे पदार्थ ज्या ज्या ठिकाणी असतील त्या स्थानाला त्या दोषांचे निवासस्थान समजणें हैं शास्त्रीय व्यवहारासाठी सोयीचें होतें. वायुपित्तकफांची स्थानें म्हणजे त्यांचे एक अथवा त्याहून अधिक गुणांची किंवा त्यांचे मुख्य क्रियांचीं ठिकाणें ---वायूचें स्थानांत कोठें रूक्षता तर कोठें गतिमत्ता, पित्ताचे स्थानांत कोठें उष्णता तर कोठें तीक्ष्णता कोठें अम्लता, कोठें विस्रता, कफाचे स्थानांत कोठें गुरुता, कोठें स्निग्धता, कोठें आर्द्रता अशा रीतींची स्थूलमानानें बोधक अशी ही स्थानव्यवस्था आहे.

--------
दोष आणि दूष्यें.


 याचप्रमाणे शरीरांतील सप्तधातूंना वातादिकांची दूष्यें ह्मणून सांगितली आहेत. दूष्य हणजे बिघडविले जाणारे पदार्थ अगर ठिकाणे. व शरीरांतील धातु सात; पैकीं, अस्थि तेवढाच कठीण आणि रूक्ष. आणि अर्थात् काठिण्य आणि रूक्षता या गुणांच्या वायूचा परिणाम प्रथम त्यांवर होणार. रक्त हा धातु उष्ण व पचनसामर्थ्य असलेला त्यामुळे उष्णता व पचनसामर्थ्याचें पित्त प्रथम रक्तावर परिणाम करतें. राहिलेले धातूंमध्ये मेद, मज्जा, शुक्र, (स्निग्धधातु) मांस गुरु व स्थिर आणि रस धातु स्निग्ध व आर्द्र हे कफाच्या त्या त्या गुणांचे समानधर्मी यांवर कफाचे अनुक्रमें स्निग्धता, गुरुता, स्थिरता स्निग्धता, व आर्द्रता या गुणांचा परिणाम होतो यामुळे.--
 वायूचा दूष्य धातु अस्थि, पित्ताचा दृष्य धातु रक्त व बाकी राहिलेले मेद, मज्जा, शुक्र, मांस, आणि रस हे पांच धातु कफाचे दूष्य अशी व्यवस्था विकृतिज्ञानाचे सोयीसाठी करण्यांत आली आहे. धातूंप्रमाणेंच मळ म्हणजे, पुरीप, सूत्र आणि स्वेद, हेहि या दोषांचे दूष्य असल्याचे सांगितले आहेत. बाष्पावस्थेतील स्वेद हा ऊष्णता-