पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३
शारीरविज्ञानामध्ये त्रिदोष हे किती महत्वाचे आहेत ?



विशिष्ट म्हणून पित्ताचें दृष्य आणि पुरीप व मूत्र हे अनुक्रमें गुरुता आणि आर्द्रता या गुणान्वये कफाचे दृष्य होत.

रसासृमांसमेदोस्थिमज्जाशुक्राणि धातवः ।
सप्त दूष्या मला मूत्रशकृत्स्वेदादयोपि च ॥ १ ॥ अ ह.


  रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे शरीरांतील धातु होत. व यांना दूष्य असें नांव आहे. (वातादिभिः दृष्यंत इति दृष्याः । सर्वांगसुंदरा टीका ) त्याचप्रमाणे शकृत् म्हणजे घनमळ, सूत्र म्हणजे द्रव मळ आणि स्वेद म्हणजे बाष्पावस्थेतील मळ हेहि दूष्य होत. अशीं दूष्ये सांगून त्यांचा व दोषांचा संबंध वरीलप्रमाणे सांगितला आहे.

तत्राsस्थनि स्थितो वायुः पित्तं तु स्वेदरक्तयोः ।
श्लेष्मा शेषेषु ॥


 या धातुमलापैकीं अस्थीमध्ये वायु रक्त व स्वेद यांमध्ये पित्त आणि इतरांत श्लेष्मा असतो ( अ. हृ. सू. अ० १२ वा. )
 अशी व्यवस्था करण्याचा उद्देश असा की, वातादि दोषांच्या विशेष क्रिया व विकृतावस्थेतील त्यांचे परिणाम विशेषतः समानधर्मी अशा या पदार्थांमध्ये घडतात ही गोष्ट सहज ध्यानी यावी. व त्याबरोबरच उपचारांचें सामान्य तत्वहि लक्ष्यांत यावे हा आहे.

_________
शारीरविज्ञानामध्ये त्रिदोष हे किती महत्वाचे आहेत ?


 शरीराचे ज्ञान म्हणजे त्याचा आकार, रचना, कार्य व त्यांतील अनेक पदार्थ व या पदार्थातील कार्यकारी पदार्थ या सर्वांचे ज्ञान होय. शरीराचे दृश्य अगर स्थूल अशा पदार्थांत, ( धातूंत ) विकृति झालेली दिसते. पण ही विकृति घडविणारे द्रव्य सूक्ष्म असतें. यामुळे विकृतिज्ञान म्हणजे निदान व विकृतीचा परिहार म्हणजे चिकित्सा या सूक्ष्म पदार्थांचे ज्ञानाशिवाय करतां येत नाही. शरीराचे दृश्य पदार्थांतील किंवा क्रियांतील विकृति समजण्याला वैद्यशास्त्र नको असतें. तें विकृतिज्ञान ज्याचें त्याला उत्तम असतें. चिकित्सकाहूनहि ' दुखणारें पोट रोग्यालाच चांगले समजते. जड डोक्याची कल्पना वैद्याने करावी पण अनुभव रोग्याला असतो. अर्थात् झालेली विकृति, कां झाली कोणत्या कार्यकारी पदार्थाचे वैषम्याने झाली याचें ज्ञान करून घेण्याला वैद्यशास्त्र पाहिजे. अर्थात् शारीरविज्ञानामध्ये शरीराच्या स्थूल किंवा प्रत्यक्ष परिचयाहून सूक्ष्म क्रियाज्ञानाला महत्व अधिक असल्याचे उघड होतें. व या दृष्टीनें शरीरांतर्गत व्यापारांचा शोध करीत असतां शरीराचे निरनिराळ्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया कशामुळे घडतात याचा विचार अपरिहार्य