पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
आयुर्वेदातील मूलतत्वें.



चिकित्सेमध्ये त्रिदोषविज्ञान किती महत्वाचें आहे ?


 त्रिदोषांचा विचार करीत असतां असा प्रश्न उपस्थित होणे संभवनीय आहे की, प्रत्येक रोगामध्यें रोगी भागांतील उत्पादक विकृतीचे सूक्ष्म आणि तात्विक ज्ञान होण्याला त्रिदोषांचे ज्ञानाचा उपयोग होतो त्याप्रमाणें चिकित्सेमध्ये होतो काय ? कोणत्याहि रोगावर चिकित्सा करावयाची ह्मणजे ज्या ठिकाणी रोग झाला त्यावर प्रामुख्यानें कार्य करील अशी चिकित्सा पाहिजे. मग एकाद्या दोषाचे अनुरोधानें ती कशी करतां यावी, दोष सर्वव्यापी व त्यांचे विकार सर्व शरीरभर कोठेंहि होणार ! अशा स्थितीत या दोषांवर उपचार केल्यास त्यांचा विशिष्ट रोगावर किंवा रोगस्थानावर परिणाम कसा व्हावा? आपाततः ही शंका बरोबर वाटते; परंतु निदानाप्रमाणें यांतहि अधिक तात्विक दृष्टीचाच विचार पाहिजे, चिकित्सेंतील त्रिदोषांचा उपयोग ह्मणजे ज्याप्रमाणें अवयव आणि इंद्रियविकृति यांचे ज्ञानानंतरहि या विकृतीचे पोटभेद समजण्यासाठी त्याप्रमाणे चिकित्सेमध्येहि स्थानी उपचारानांच महत्व आहे. आप शारीरविकृतीचा विशिष्टस्थानाश्रय रोगांत प्रमुख त्याप्रमाणे विशिष्ट स्थानावर व त्यांतील रोगावर काम करणारे उपचार हेच श्रेष्ठ असून आयुर्वेदाने याच तत्वांना महत्व दिले आहे कफानें श्वास होतो, खोकला येतो, राजयक्ष्मा होतो, वांति होते, सुस्ति येते, यांवर एकच कफनाशक उपाय न सांगतां श्वासनाशक, कासनाशक, क्षयनाशक इत्यादि रोगविनाशक औषधांच्या नांवांनींच उपयोग केला आहे. पित्तानें वांति, अतिसार, अंतर्दाह, बहिर्दाह, रक्तपित्त, उर इत्यादि विकार होतात त्यांवर आयुर्वेदांत केवळ पित्तशामक उपचार सांगण्याचा अप्रयोजकपणा कोठेच नसून त्या त्या रोगाचे नाशक असेच उपाय सांगितले आहेत वायूने अनेक विकार होतात. पक्षघात, सर्वांगघात्, आक्षेपक, अर्दित इत्यादि वातजन्य विकारांत उपचार एकच नाहीं. रोगस्थानाला अनुलक्षूनच त्यांवर निरनिराळे उपचार सांगितले आहेत. असें असतांहि या अनेकविध विकारांमध्ये ज्याप्रमाणे उत्पादक कारणाचे एकादें विशिष्ट साम्य असतें त्याप्रमाणें चिकित्सेचें धोरणहि सामान्य राखावयास येते. विकार कोणत्याहि शरीरभागावर झाला असला आणि स्थानभेदानुसार जरी त्यामध्ये विकृतीचा फरक असला तरी मुख्य ज्याप्रमाणे शारीरिक तीन क्रियांपैकी एक, दोन अथवा तीन क्रियांची विकृति असावयाची त्याचप्रमाणे विशिष्ट स्थानावर कार्य करणान्या उपचारांमध्ये विकृत क्रियांवर म्हणजे दोषांवर कार्य करण्याचे धोरणहि त्या उपचारांत पाहिजे. आणि यासाठींच चिकित्सेमध्यें त्रिदोषांचा उपयोग केला जातो. आयुर्वेदानें. --