पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
॥ श्रीमहामृत्युंजयो जयतितराम् ॥

.

आयुर्वेदांतील मूलतत्वे
अथवा
त्रिदोष.
**********
थोडक्यांत वस्तुबोध.

  प्र० १:-त्रिदोष म्हणजे काय ? उत्तरः--शरिरांतील सर्व प्रकारच्या क्रियांचे प्रवर्तक असे सामर्थ्यसंपन्न व सर्व शरीरघटकांत व्यापून राहणारे सूक्ष्म अणु.

 प्र०२:-त्रिदोष दृश्य आहेत की अदृश्य ? उत्तरः-स्थूळ व सूक्ष्म हे शब्द सापेक्ष आहेत. तथापि सूक्ष्म अशा घटकांतीलहि सूक्ष्म अणु म्हटल्यावर ते दृश्य आहेत असे म्हणतां यावयाचे नाही. ते दृश्य नसून तर्कानुमेय आहेत.
 प्र०3:-त्रिदोष दृश्य नाहीत तर त्यांचे अस्तित्व का मानावें ? उत्तरः-शरीर हा एक अनेक प्रकारच्या पंचभौतिक घटकांचा समुदाय आहे. हे घटक नित्य झिजणारे, आणि नित्य नवे उत्पन्न होणारे आहेत, असें अनुभवास येते. रोजचे आहाराची गरज हे उघड सुचविते. नित्याची झीज व उत्पत्ति जर या घटकांचे सर्वांशाने झाली असती, तर नव्या आहाराने शरीर अजरामर ठेवता आले असते. तसे घडत नाही. यावरून असा एकादा भाग मानणे भाग आहे की जो या नित्याचे जनन मरणाचा परिणाम भोगीत नाही. आणि जो शतसंवत्सर पावेतों टिकतो. प्रत्येक घटकाचा नित्य विनाशी असा जो भाग त्याहून हा शंभर वर्षेपर्यंत अविनाशी असा भाग आहे. त्यावर नवीन अवयव (घटकाचा) वाढतो, व झिजतो, आणि त्याची शक्ति कमी झाली की, ही क्रिया घडत नाही. अर्थात् प्रत्येक घटकाचा सूक्ष्म अवयव व त्याकडेच कर्तृत्व असल्याचे मानावे लागते. आणि असला प्रत्येक घटकाचा सूक्ष्म भाग जरी साध्या डोळ्यांना दिसला नाही तरी तार्किक दृष्टीला त्याचे स्वरूप स्पष्ट दिसणारे आहे.
 प्र०४:-त्रिदोष हे केवळ शक्तिस्वरूप की पदार्थ ? उत्तरः -सृष्टीतील कोणतेहि सामर्थ्य, गुण अथवा धर्म हे निराधार राहू शकत