पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 अशक्य होईल. अनेक विकारांत ज्याप्रमाणे संयोजन, त्रिभाजन आणि वियोजन यांचे म्हणजे त्रिदोषांचें विकृतिविज्ञान है सूक्ष्मज्ञानकारक असतें, त्याचप्रमाणे या त्रिकृतींना शामक म्हणजे कुपित दोषांचें शामक असे उपचार ठरविण्याला जें ज्ञान त्याचा आयुर्वेदाचे परिभाषेला अनुसरून त्रिदोषांत अंतर्भाव करणें स्वाभाविक आहे. रोगाविरुद्ध उपचार हेंच तत्व आयुर्वेदालाहि मान्य आहे व्याधिप्रत्यनीक चिकित्सा हें आयुर्वेदीय चिकित्सेचें मुख्य अंग असल्याचें चिकित्साप्रकरणी पहावयास मिळेल. त्याचप्रमाणे रोग व रोगी यांच्या अनेक अवस्थांना अनुसरून प्रतिबंधक, (हेतुप्रत्यनीक) विनाशक ( व्याधिप्रत्यनीक) मिश्र (उभयप्रत्यनीक) उपद्रवशामक, वेदनाशामक इत्यादि जरी अनेक प्रकार असले तरी या सर्व प्रकारांमध्ये एक अशा प्रकारचें धोरण स्वीकारणें अवश्य आहे की ज्यामुळे कोणत्याहि प्रकारची चिकित्सा रोगस्थानीय नैसर्गिक क्रियेची विकृती दूर करणारी असावयास पाहिजे हें धोरण सांभाळणे हेच त्रिदोषांचें चिकित्सेतील महत्व होय आयुर्वेदाने केवळ दोषांचेवर स्थूलमानानें चिकित्सेची उभारणी केली अशी समजूत अज्ञानमूलक किंवा दुराग्रहमूलक आहे. आयुर्वेदाचें चिकित्साविषयक वाङ्मय पाहतां ही गोष्ट उघड प्रत्ययास येणारी आहे.
 येथपर्यंत आयुर्वेदातील त्रिदोषांची मूळ कल्पना व तिचें यथार्थत्व, सर्व शरीरांतील त्यांची व्याप्ति, महत्व, कार्यकरिता, समविप्रमावस्थेतील क्रिया, प्रकार, विकार, अवस्था, निदान चिकित्सेंतील महत्व यांचे दिग्दर्शन केले आहे. व त्यावरून शारीरविज्ञानामध्ये त्रिदोषांची कल्पना ही उपपत्तिपूर्ण, अवाधित व निदानचिकित्सेच्या सोयीची असल्याचें ध्यानी येईल आयुर्वेदाच्या सर्व वाङ्मयांत त्यांचा उपयोग केला असून तात्विकदृष्ट्या त्यांचा उपयोग होत आहे. अशा या त्रिदोषांचें नित्योपयोगी स्वरूप ध्यानी येण्यासाठी किंवा राहण्यासाठी खालील कोष्टक दिले आहे.
  १ दोष- म्हणजे शरीरघटकांतील स्थिर क्रियाकारी सामर्थ्यसंपन्न व आयुष्याचे मर्यादेपर्यंत टिकाऊ असा सूक्ष्म अंश. अणुभाग.
  २ याचेच तीन पोटभाग हणजे तीन दोष. एक संयोजक, संग्राहक किंवा संघटनात्मक कार्य करणारा दुसरा विभाजक किंवा पचन व पृथक्करण ही कार्ये करणारा आणि तिसरा वियोजक किंवा गतिमान अथवा उत्सर्जनात्मक कार्य करणारा.   ३ यांना अनुक्रमे श्लेष्मा, पित्त व वायु हीं नांवें आहेत.
  ४ अनुक्रमें, 'श्लिष " तप् ' व ' वा' या संग्रह, पचन, व गति अशा अर्थाच्या धातूंपासून तयार झालेलीं हीं नांवें अन्वर्थक आहेत.
  ५ हे दोन सर्व शरीरभर आहेत तथापि त्यांचें अधिक प्रमाणांत