पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२९
चिकित्सेमध्यें त्रिदोषविज्ञान किती महत्वाचें आहे ?


वास्तव्य, वायूचें पक्वाशयात, पित्ताचे पच्यमानाशयांत आणि कफाचें आमाशयांत याप्रमाणें असतें.
  ६ या दोषांचा बोध त्यांचे क्रियांना अवश्य जे गुण त्यांवरून होतो. असे दोषांचे गुण-  वायूचे - १ रूक्षता, २ लाघव, ३ शीतता, ४ खरखरीतपणा, ५ सूक्ष्मता, व ६ चलता.
 पिताचे -- १ किंचित् स्निग्धता, २ तीक्ष्णता, ३ उष्णता, ४ लघुता, ५ आंबुसपणा, ६ सारकपणा, व ७ द्रवता.
 कफाचे - १ स्निग्धता, २ शीतता, ३ गुरुता, ४ मंदता, ५ गुळगुळीतपणा, चकाकी - चिकटपणा ७ स्थिरता. (एकूण ६+७+७= २० ).
  ७ या त्रिदोषांचे शरीराचे धातूंमध्यें अधिकप्रमाण, वायु अस्थीमध्यें, पित्त रक्तांत आणि कफ इतर पांच धातूंत याप्रमाणे असते.
  ८ त्रिदोषांची मुख्य सांगीतल्या स्थानांशिवाय आणखी स्थानें वायूची पक्वाशय, श्रोणिमंडल, सक्थि, ( तंगड्या व हात ) श्रवणेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय.
 पित्ताची - नाभि, (ग्रहणी) आमाशय, ( आंतडीं ) स्वेद, लस, रक्त, रसधातु, त्वचा व स्पर्शनेंद्रिय.  कफाची - ऊर, कंठ, मस्तक, क्लोम, सांधे, आमाशय, (अन्नाशय.) रसधातु, मेदधातु, घ्राणेंद्रिय रसनेंद्रिय. याप्रमाणे आहेत.
  ९ त्रिदोषांचे क्रियाकारी प्रकार व स्थाने-- वायु० प्रकार पांच- नांवें -१ प्राण, २ उदान, ३ व्यान, ४ समान, ५ अपान.
 पित्त प्रकार पांच- नांवें १ पाचक २ रंजक ३ साधक, ४ आलोचक ५ भ्राजक.  कफ प्रकार पांच- नांवें - १ अवलंबक, २ क्लेदक ३ बोधक, ४ तर्पक ५ श्लेषक.  प्राणवायूचें स्थान मस्तक त्याचा संचार ऊर व कंठ यांमध्ये असतो.
  उदानवायूचे स्थान ऊर. संचार वर नाक व खालीं नाभिपर्यंत असतो.
 व्यान वायूचें स्थान हृदय - संचार सर्व शरीरभर असतो.
  समानवायूचें स्थान- ग्रहणीसमीप व संचार सर्व आंतड्यांत असतो.
  अपानवायूचें स्थान, अपानद्वार व संचार अधोभागांतील उत्सर्जनमार्ग व श्रोणिमंडल यांमध्ये असतो.
 पाचकपित्ताचें स्थान ग्रहणी. रंजकपित्ताचे स्थान यकृत् साधकपित्ताचें स्थान हृदय, अलोचक पित्ताचें स्थान नेत्र व भ्राजकपित्ताचें स्थान त्वचा.