पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 अवलंबक कफाचें स्थान ऊर, क्लेदक कफाचें स्थान आमाशय, बोधक कपाचें स्थान रसनेंद्रिय, तर्पक कफाचें स्थान मस्तक व श्लेशक कफाचें स्थान संधि; याप्रमाणे स्थाने आहेत.

________
१० निरनिराळ्या स्थानांतील दोषांच्या नैसर्गिक क्रिया.

 प्राणवायूच्या क्रिया म्हणजे बौद्धिक व्यापारांची प्रवृत्ति करणें आणि श्वासमार्ग-कंठ-यांवर अवलंबून असलेल्या थुंकणे, गिळणे, श्वासोच्छ्वास, खोकर्णे इत्यादि क्रिया होत. या भागांतील वायूमुळे ही नित्य कार्य घडतात.
  उदानवायूचे शरीरांतील नित्य कार्य म्हणजे, बोलणे, प्रयत्न, उत्साह, वर्णाच्चारण स्मरण वगैरे.
 व्यानवायूच्या नित्यक्रिया म्हणजे सर्व शरीराच्या लहानमोठ्या एकूण एक हालचाली.
 समानवायु अन्नपचनाचें आणि त्याज्यांश व ग्राह्मांश यांचे पृथक्करणाचे कार्य करतो.
 अपानवायु, मल, मूत्र, शुक्रार्तव, गर्भ यांचे उत्सर्जन करतो.
  पाचकपित्त अन्नपचनाचे कार्य प्रामुख्याने करणारें आणि शरीरांतील सर्व भागांत पाचक तत्वाचा ( अन्नरसद्वारा ) पुरवठा करणारें.
  रंजकपित्त अन्नरसाला लाली आणणारें.
 साधकपित्त स्मरण, धारणाशक्ति, बुद्धि इत्यादिकांनी इष्टार्थ साधन करते
.  आलोचक पाहण्याचें काम करते.
 भ्राजक त्वचेवर तेजस्विता ठेवण्याचे काम करणारें.
 अवलंबक नांवाचा कफ सर्व ककस्थानें, त्रिकसंधि, ( माकडहाड) हृदय ह्यांतील कफाच्या क्रिया या कफावर अवलंबून असतात.
 क्लेदक कफ आमाशयांतील अन्नांत पातळपणा उत्पन्न करतो.
 बोधक कफ जिमेला रसाचा बोध करतो.
 तर्पक कफ इंद्रियांची तृप्ति ( समाधान ) राखतो.
 श्लेषक कफ, सांधे चिकटवून ठेवण्याचे कार्य करतो.
  वातादींचे पोटभेदांची ही नांवें घडणान्या क्रियांवरून दिलेलीं सार्थ आहेत.

११ दोषांच्या विकृतीचीं सर्वसामान्य कारणें.

 वायु तुरट, तिखट, कडु, रूक्ष असल्या पदार्थांनीं, कमी खाण्याचे संवयीनें बंगांचा अवरोध किंवा जुलमी प्रवृत्ति, जागरण, फार मोठ्यानें