पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३१
स्वाभाविक काळ

 बोलणे, अतिश्रम, व्यायामातिरेक, वमनविरेचनादि शोधनांचा अत्युतयोग. चिंता, अतिव्यवाय, विषमाचार इत्यादि कारणांनी वाढतो- विकृत होतो.
 पित्त तिखट अम्ल, खारट असले त्याचप्रमाणे विदाहि म्हणजे जळजळ करणारे पदार्थ, क्रोध, ऊन्ह वगैरेनीं कुपित होतें.
 कफ गोड, आंबट, खारट पदार्थ, स्निग्ध, जड, शीत, अभिष्यंदि असले पदार्थ, श्रमांचा अभाव, दिवसा झोंप, अजीर्ण इत्यादि त्याचप्रमाण वमन वगैरे शोधनांच्या हीन योगानें दूषित होतो.

(१२) वातादींचे वाढ, प्रकोप आणि प्रशम यांचे
स्वाभाविक काळ.

 वायु ग्रीष्मऋतूंत वाढतो, वर्षाऋतूंत कुपित होतो. ( विकार करतो.) शरदृतुतं त्याचा स्वाभाविक शम होतो.
 पित्त-वर्षा ऋतूंंत वाढते. शरद ऋतूंत कुपित होते आणि हेमंत ऋतूंत शम पावतें.
 कफ -- शिशिर ऋतूंत वाढतो, वसंत ऋतूंत कुपित होतो व ग्रीष्म ऋतूंत शम पावतो.

(१३) दोषांच्या दैनिक वाढीच्या वेळा.


 दिवसाचा व रात्रीचा उत्तर भाग आणि आहाराची पक्वावस्था या वेळी वायूची वाढ होते.
 पित्ताची वाढ, दिवस रात्रीचा मध्यभाग आणि आहाराचे पच्यमान अवस्थेत होते.
 कफाची दिवस आणि रात्रि यांचा पूर्वभाग व आहाराची प्रथमची आमावस्था यांत वाढ होते.
 ( इतर वेळी समप्रमाणांत व वाढलेल्यांच्या अपेक्षेनें इतर कमी प्रमाणांत असतात. )

(१४) दोषांचे वर्धक व शामक रस.

रस- मधुर- अम्ल - लवण- कडु- तिखट -तुरट
वायु) कमी क. = कमी क. = कमी क. = वाढवितो = वाढवितो = वाढवितो
पित्त ) कमी क. = वाढवितो = वाढवितो = कमी क. = वाढवितो = कमी क.
. कफ )वाढवितो = वाढवितो = वाढवितो = कमी क. कमी क. कमी क.