पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
आयुर्वेदांतील मूलतत्वेंउष्ण.



(१५) कोणते पदार्थगुण चयप्रकोपप्रशम करतात.

संचयकारक गुण) उष्णयुक्तरूक्षादि =शी. युक्त तीक्ष्णादि=शी युक्त स्निग्धा. प्रकोपकारक गुण) शीत = उष्ण = उष्ण

प्रशमकारक गुण) उष्णयुक्त स्निग्धादि = शीतयुक्त मंदादि = उ. रूक्षादि.

(१६) वातादींची वाढीचीं लक्षणें.

 वायु वाढला असतां, कृशता, काळेपणा, ऊष्ण पदार्थाची इच्छा, कंप, पोट फुगणे, मलावरोध, बलाचा -हास, निद्रानाश, इंद्रियांमध्ये अशक्तपणा, बडबड, भ्रम आणि विकलता उत्पन्न करतो.
 पित्त वाढले असतां, त्वचा, नेत्र, नखे, मलमूत्र यांवर पिवळेपणा, क्षुधा, तृषा अधिक, दाह, झोंप कमी हीं लक्षणें उत्पन्न होतात.  कफ वाढला असतां अग्निमांद्य, तोंडाला पाणी सुटणे, आळस, जाड्य, अंगाला गारपणा, फिकटपणा, गळल्यासारखे वाटणे, दमा, खोकला, झोंप फार ह्रीं लक्षणें उत्पन्न करतो.

(१७) दोषांच्या क्षीणतेचीं लक्षणें.

 वायु क्षीण झाला असतां अंगाला सुंदपणा, बोलणे व शरीर व्यापारांत कमीपणा हीं लक्षणें होतात.
 पित्त क्षीण असतां पचनशक्ति कमी होते, शैत्य वाढते आणि कांति कमी होते.
 कफ क्षीण झाला असतां, भ्रम, कफस्थानांत स्तब्धता, हृदय आणि संधि यांमध्ये शिथिलता वाटणे ही लक्षणे होतात.

(१८) कुपितावस्थेतील विकार.

 वायूची कुपितावस्थेतील लक्षणें - अवयव स्थानभ्रष्ट होणे, आंचके येणें, टोचल्यासारखें दुखणे, सुप्तता, इंद्रियांमध्ये सुंदपणा, शूल, चुरचुरणे, रोमांच, फोडल्याप्रमाणे वेदना ( हाडे ) तहान, कंप, कठीणपणा येणें, रूक्षता येणें, पोकळी येणें, स्फुग्ण, वांकडेपणा येणे, गुंडाळल्यासारखें, (मांसपेशी) वाटणे, ताठणे, तोंडाला तुरटपणा येणें, वर्ण काळसर किंवा तांबुस हीं कुपित वायूचीं लक्षणें होत.
 पित्त कुपित झालें असतां, दाह, लाली, उष्णता वाढणे, पिकणे, घाम येणे, पाणी सुटणे, स्राव होणे, कुजणें, शरीर म्लान होणें, मूर्च्छा, उन्मत्तपणा, आंबटपणा, व तोंडाला तिखटपणा अथवा कडुपणा येणें आणि श्वेत व तांबुस यांशिवाय रंग हीं लक्षणें उत्पन्न करते.