पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग्रंथसंग्रहलय, वाई
१३५
ग्रंथोक्त वाक्यें.


( २४ ) दोष आणि कोठा.

 वातानें कोठा क्रूर असतो, यावर विरेचनाचा उपयोग कष्टाने होतो. पित्तानें कोठा मृदु असतो यावर सौम्य विरेचन लागू पडते.  कफानें कोठा मध्यम असतो. यावर तीव्र विरेचन योजावें लागतें.
  ( निदान चिकित्सेमध्यें नित्य व्यवहार्य अशा या गोष्टी चिकित्सकाचे ध्यानीं नेहमीं असाव्या लागणाऱ्या असल्याने त्यांचा उल्लेख केला आहे. याला आयुर्वेदीय ग्रंथाचे आधार मुळांतील खाली क्रमानें दिले आहेत. )

ग्रंथोक्त वाक्ये.

 ( १ ) वायुः पित्त कफश्चेति त्रयो दोषाः समासतः ॥
  विकृताऽविकृता देहं धनंति ते वर्तयंति च ॥ १ ॥ सू. अ. १ले.
 (२) विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिला यथा ॥
 ( ३ ) धारयंति जगद्देहं कफपित्तानिलास्तथा ॥ २ ॥ सु. अ. १९
  ( ४ ) तत्र 'वा, गतिगंधनयोरिति धातुः,
  'तप, संतापने, 'श्लिष अलिंगने,
 इत्येषां व तपित्तश्लेष्मेति रूपाणि भवंति ॥ ३ ॥ 
  (५) ते व्यापिनोपि हृन्नाभ्योरधोमध्योर्ध्वसंश्रयाः ।। अ.सू. अ. १
  (६) तत्र रूक्षो लघुः शीतः खरः सूक्ष्मश्चलोऽनिलः ॥ ४ ॥
  पित्तं सस्नेहतीक्ष्णोष्णं लघुवित्रं सरं द्रवम् ॥
 स्निग्धः शीतो गुरुर्मदः श्लक्ष्णोमृत्स्नः स्थिरः कफः ॥५॥ अ. ह. सू. अ. १
 [ ७ । तत्रास्थानि स्थितो वायुः पित्तं तु स्वेदरक्तयोः ॥   श्लेष्मा शेषेषु ॥}}
 (८) पक्काशयकटीसक्थि श्रोत्रास्थिस्पर्शनेंद्रियांस्थानं वातस्य ॥
   नाभिरामाशयः स्वेदो लसीका रुधिरं रसः ॥
   दृकस्पर्शनं च पितस्य । (७)
   उरःकंठशिरः क्लोम पर्वाण्याशयो रसः ॥
   मेदो घ्राणं च जिव्हा च कफस्य ॥

अ.हृ.सू. अ. १२ श्लोक १-३


 (९) प्राणादिभेदात् पंचाला वायुःप्राणोऽत्र मूर्धगः ॥
  उर. कंठचरो बुद्धिहृदयेद्वियचित्तधृक् ॥ ११ ॥ ( ९ )
  ष्ठीवनश्चवधूद्वारनिश्वासान्नप्रवेशकृत् ॥
  उरःस्थानमुदानस्य नासानाभिगलांश्चरेत् ॥ १ ॥ ( १० )
  वाक्प्रवृत्तिप्रयत्नोज बलवर्णस्मृतिक्रियः ॥
 व्यानो हृदिस्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः ॥ १ ॥ ( ११ )