पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४2
आयुर्वेदांतील मुलतत्वें



तएवत्त व्यापन्नाः प्रलयहेतवः । ( सु० सू० अ० २१ )
विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिला यथा ॥
धारयंति जगदेहं कफपित्तानिलास्तथा ॥ सु०सू० अ० २१ अ ८


  या प्रकारचा निर्वादसिद्धांत आयुर्वेदतत्वज्ञानाचा पाया झाला. आयुर्वेदाच्या उपपत्तीचे मुख्य तत्व व शरीरांतील अत्यंत महत्वाचे असे हे पदार्थ असतांहि त्यांना सर्व आयुर्वेदीय वाङ्मयांत दोष या नांवाने संबोधण्याचे कारण, रोगीअवस्थेत शरीराला बिघडवितो कोण या उपस्थित प्रश्नाला हे उत्तर आहेत.

नाही पेक्षां शरीर धारण करणारे प्रमुख असतां त्यांना दोष या नांवानें ओळखण्याचें कारण नव्हते. आणि अधिकृत स्थितीमध्ये त्यांना दोष हैं नांव अन्यर्थक नाहींहि. अविकृतावस्थेमध्ये देहधारणाच्या अर्थाचे द्योतक असे धातु हें नांव ग्रंथकारांनी योजलेंहि आहे; तथापि एकंदर प्रचार दोष, या नावानेच असून "दोषधातुमलमूलहि शरीरम् " याप्रमाणे शरीराचे वर्गीकरणांत धातु या नांवानें दुसऱ्या पदार्थांचा उल्लेख असल्याने दोष, हें प्रचलित नांव अधिक सोयीचें आहे. तत्वतः अविकृत किंवा निरोगी अवस्थेत त्यांना धातु हें नांव देतां येईल. आणि रोगावस्थेत, दोष हें नांव सार्थ खरें. पण मग देहधारक या नात्याने मलांनाहि धातु हें नांव संभवते. व अशा रीतीनें धात्वर्थावरून अर्थ स्वीकारावयाचा म्हणजे या अर्थाची अव्याप्ति अतिव्याप्ति टळत नाहीं व म्हणूनच, दोष धातु आणि मळ ही रूढ नांवेंच स्वीकारणें अधिक श्रेयस्कर होय. दोषांना उत्सर्जनीय किंवा शोधनीय अवस्थेत मळ या नांवानें उल्लेखण्यांत येत असतें. पण सामान्य शास्त्रीय व्यवहारांत धात्वर्थावर भर देऊन भागत नाहीं. असो.

--------
धातु आणि मळ.

 वातादि दोषांच्या स्वरूपाची नीट ओळख होण्याला त्यांचे सहचर जे धातु व मळ त्यांचीहि ओळख असावयास पाहिजे. अंगप्रत्यंगशः शरीराचे अनेक विभाग असले तरी त्या सर्व अंगावयवांचे तीन पदार्थात वर्गीकरण होते. सर्व अंगावयवांचे समवायि कारण हे तीन पदार्थ होते. व म्हणून

दोषधातुमला मूलं सदा देहस्य

 असा आद्य सिद्धांत सांगण्यांत आला. या तीन पदार्थांपैकीं एक दोष त्यांचे वर्णन आतांपर्यंत झाले. धातु सात ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. शरीरांत दिसणारे हे स्वतंत्र व स्पष्ट पदार्थ आहेत. पैकी पहिल्या रसधातूचें आणि रक्त धातूचे स्वरूप बहु·