पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३
धातु आणि मळ

 तेक सारखे असून मिश्र किंवा संदिग्ध असें आहे. रसधातु ह्मणजे जठरांत अन्न पचन होऊन त्यापासून एक रस तयार होतो व नंतर हा अन्नरस यकृतांतील पित्तानें पुनः पचनसंस्कार पावून त्याला रक्तवर्ण येतो. असा संस्कार झाल्यावर त्याला सर्व शरीरभर फिरण्यासारखे स्वरूप येतें. आयुर्वेदांत या तयार झालेल्या अन्नांतील पोषक पदार्थाला रसधातु हैं नांव आहे. कित्येक अन्नरस म्हणजे रसधातु मानतात व सकृद्दर्शनीं असा अभासात्मक समज होण्याला आधारहि आहेत. सुश्रुतामध्ये “ तत्र पांचभौतिकस्य, चतुर्विधस्य, षडृसस्य द्विविधवीर्यस्य, अष्टविधवीर्यस्य वाऽनेकगुणस्योपयुक्तस्याहारस्य सम्यक् परिणतस्य – यस्तेजो भूतः सारः स रसइत्युच्यते । असें वर्णन आहे. अन्नाचे चांगल्या रीतीनें पचन होऊन त्यापासून निघणारा जो सारभाग त्याला रस हें नांव आहे. असा याचा तात्पर्यार्थ असून त्यावरून हाच रसधातु अशी स्वाभाविक कल्पना होते. आणि याच वर्णनाचे पुढें--

रंजितास्तेजसात्वापः शरीस्थेन देहिनां ।
अव्यापन्नाः प्रसन्नेन रक्तमित्यभिधीयते ॥ १ ॥

सु० सू० अ० १५).

 असा श्लोक आहे. शरीरस्थ अशा तेजानें ( पित्तानें ). आप् ह्मणजे रसधातु रंजित झाला (लाल ) म्हणजे त्याला रक्त म्हणतात. असा अर्थ या श्लोकाचा होतो व तें रक्ताचें वर्णन अशी समजूत होते. अर्थात् मागील अन्नरस म्हणजे रसधातु या कल्पनेला हा श्लोक पुष्टिदायक होतो परंतु. - आयुर्वेदाचे सर्व वाङ्मय पाहतां ही समज साफ चुकीची असल्याचें ध्यानीं येईल. आयुर्वेदामध्ये. --१ सर्व शरीर सप्त धातूंचे मानले असून त्यांतील रसधातु हा एक असल्याचे सांगितलें आहे. २ धातु हे सर्व शरीरव्यापी आहेत म्हणजे रसधातु हाहि व्यापी पदार्थ पाहिजे. ३ रसधात्वाश्रयी असे सर्वशरीरव्यापी ज्वरकुष्टादि विकार सांगण्यांत आले आहेत. ४ हृदयांतील रक्तवर्ण पावलेल्या पदा र्थाला रसधातु याच नांवाने आयुर्वेदीय वाङ्मयांत सबोधले आहे. रक्त या नांवानें नाहीं. याला आयुर्वेदांतील प्रमाणे अशी आहेत.

रसासृङ्मांसभेदोऽस्थिमज्जाशुक्राणि धातवः ।

( अ० ह० सू० अ० १ ).

-----