पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१૪૪
आयुर्वेदांतील मुलतत्वें



रसगत ज्वराचीं लक्षणें.
गुरुता हृदयोत्क्लेशः सदनछर्द्यरोचकौ ॥
रसस्थे तुज्वरेलिंग दैन्यं चास्योपजायते ॥ १ ॥

( माधव निदान ज्वर ).

 ज्वर रसधातूमध्ये असतां अंगाला जडता, मळमळ, अग्निमांद्य, व स्तुति, अरुचि, ही लक्षणे होतात. त्याचप्रमाणें.

'रसरक्ताश्रितः साध्यः ।

( माधव निदान ज्वर प्र० ).

 रसरक्ताश्रयी ज्वर साध्य असतो. तसेंच " संततौरसरक्तस्थौ " (मा. नि. ज्व.) संतत व सततक हे ज्वर अनुक्रमें रसधातु व रक्तधातु यांचे आश्रयाने होतात. ज्वर हा विकार सर्वांगव्यापी आहे. अर्थात् रसधातू जर सर्वांगव्यापी असेल तरच ज्वराचा त्यामध्ये संभव हैं अगदीं उघड आहे. कुष्ठांचे वर्गीकरणांतहि त्वग्गत कुष्ठ हैं रसधात्वाश्रयी असल्याचा उल्लेख आहे. व त्यावरून त्वचेमध्ये रसधातु असतो हैं उघड झालें. मा.नि.म. टीकेमध्ये " त्वक्शब्देना त्ररसोभिधीयतेधातुप्रस्तावात् । त्वक्शब्देनरसस्याभिधानता स्यात् । भोजेप्युक्तं- प्रदुष्टाः प्रच्युता दोषा रसासृऽमांससंश्रिताः ॥ कुष्टानि जनयत्याशु शरीरेषु शरीरिणाम् ॥ १ ॥ अशा प्रकारचा उल्लेख आहे. तसेंच उल्लनाच्या सुश्रुतसंहितेवरील टीकेत हि - " प्रागेव रसधातुं क्रोडीकृत्य दोषाः कुष्टारंभकाः, रसधातुलक्षण नोक्तमित्येके अपरे त्वक्शब्देन रसमाहुः । असा खुलासा आहे. मसूरिका अथवा देवी या विकाराचे दृष्यांमध्ये रसधातूचा त्वक् शब्दानें उल्लेख आहे. “त्वक शब्देनात्र रसोऽभिधीयते । ( मधुकोश ) यावरून रसधातूची व्याप्ती उघड होते. रसाचा शरीरांत सर्वत्र प्रसार असल्याचा उल्लेख आहे. " सशब्दाचिर्ज्वलनसंतानवदणुना विशेषेण अनुधावत्येव केवलं शरीरम् ॥ ( सुश्रुत सू. अ. १४ )

व्यानेन रसधातुर्हि विक्षेपोचितकर्मणा ॥
युगपत्सर्वतोऽजस्त्रं देहे विक्षिप्यते सदा ॥ १ ॥
क्षिप्यमाणः स्ववैगुण्यात् रसः सज्जति यत्र सः ॥
तस्मिन् विकारं कुरुते स्वे वर्षमिव तोयदः ॥ २ ॥

( अ. ह. शा. अ. ३ श्लो. ६८ । ६९. )

 या वाक्यांचा अर्थ रसधातु सर्व शरीरभर निरंतर फेंकला जात असून त्याला ज्या शरीरभागांत अडथळा होतो त्या जागी विकार होतो असा आहे. चरकांत " रसवहानां स्रोतसां हृदयं मूलं दश च धमन्यः " म्हणजे रसवाहि स्रोतसांचें मूळ हृदय व त्यापासून निघणाऱ्या