पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्राहालय, वाई


१४९
रसगत ज्वराचीं लक्षणें.

 दहा धमनी असें आहे. ह्मणजे हृदयांतून सर्व शरीरभर पसरणारा धातु रसधातु होय हे उघड होते. चरकांत हृद्रोगाची प्राप्ति सांगत असतां, 'ममैकदेशे संक्लेदं रसश्वास्योपगच्छति । ह्मणजे हृदयाचे एकाद्या भागांत ज्यावेळी रसधातु दूषित होईल त्यावेळी योग होतो असे वाक्य आहे. व यावरून हृदयांत व सर्व शरीरांत रसधातूची व्याप्ति उघड होते. आयुर्वेदानें रसधातूचे वाढीचीं किंवा -हासाचीं जीं लक्षणे सांगितलीं आहेत त्यांमध्येहि सर्व शरीरगत अशी आहेत. तात्पर्य, रसधातु ह्मणजे अन्नरस नसून तो सर्व देहभर पसरलेला स्रोतोगामी असा रक्ताची पूर्वावस्था स्वरूपी धातु होय. व कफाचें दूष्य हा धातूच समजावयाचा. दुसरा धातु रक्त होय. सर्व शरीरांतील शिरांमध्यें हैं आहेच. रसधातु व रक्तधातु यांतील फरक ह्मणजे रसाचें शरीरांतील पांचक शक्तीने पचन होऊन त्यांतील मळ पृथक् झाल्यावर जे स्वच्छ स्वरूप राहतें तें रक्त होय; आणि त्यापूर्वीचा रसधातु समजावयाचा. अन्नरसाला रसधातु मानणारे रसधातूलाच रक्त मानतात. परंतु शरीरांतील पचनसंस्कार पावलेलें रक्त व त्यापूर्वी रसधातु हा भेद ध्यानी घेणे अगत्य आहे.
 रक्ताविषयीं आणखी एक ध्यानी घेण्यासारखी गोष्ट ह्मणजे अशुद्ध रक्त म्हणून सध्यां प्रचारांत ज्याचा उल्लेख करण्यांत यतो त्याला आयुर्वेदामध्ये रक्ताचा मळ म्हणून ओळखण्यांत येत असते. प्रत्येक धातूचा मळ सांगितला आहे. त्यांत रक्ताचा सांगितला आहे. रसराक्तांतील त्याचप्रमाणे शुद्धाशुद्ध रक्ताविषयीं आयुर्वेदाची भाषा ध्यानांत न राहिल्याने निदान चिकित्सेमध्यें घोटाळा होण्याचा संभव असतो. असो
 तिसरा धातु मांस हा होय. याचे स्वरूप स्पष्टच आहे. मांसाच्या अनेक घटकांनी तयार झालेल्या संघाताला पेशी म्हणतात.
 चवथा धातु मेद हा होय. हा मांसल भागांत व उदरांत (उदराच्यदक आवरणांत किंवा कलेत ) विशेष असतो. मांस तयार झाल्यावर त्यापासून हा पदार्थ तयार होऊन आयुर्वेदानें जी 'एका धातूपासून दुसऱ्या धातूची उत्पत्ति अशा एकाची एक परंपरा मानली आहे तीप्रमाणे मांस व अस्थि यांचे मध्यवर्ति व मध्यस्वरूप असा हा धातु होय. हा पदार्थ तुपासारखा आहे. याचें स्थान त्वचेखालीं मानण्याचा प्रचार सध्यां दिसतो. परंतु धातुपरंपरेप्रमाणे मांसोद्भव व मांसानंतर उत्पन्न होणारा हा पदार्थ पेशींचे खालीं व अस्थीचे वर असावयास पाहिजे. त्वचेखाली असणारा पदार्थ वसा या नांवाचा समजावयाचा. हा स्निग्ध पदार्थांचा मळ होय. शुद्धमेदोधातु नव्हे. आयुर्वेदामध्ये रसरक्ताश्रयी विकारांहून मेदोगत विकारांना कष्टसाध्य मानण्यांत येते; या- अ... ७