पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
1४६
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 वरून मांसाहूनहि अधिक स्वच्छ अधिक टिकाऊ, अधिक महत्वाचा हा धातु आयुर्वेदीयांना वाटतो हैं उघड आहे व ह्मणून हा धातु त्वचेखालील स्निग्ध पदार्थ नव्हे.
 पांचवा धातु अस्थि किंवा हाडे आणि सहावा मज्जा हा धातु अस्थींचे पोकळींत भरून राहिलेला घन स्वरूपाचा तुपासारखा पदार्थ. शुक्र हा धातु सातवा हा मज्जेचेंच एक त्याहूनहि स्वच्छ असे तयार होणारे स्वरूप असून तो सर्वत्र आहे तरी विशिष्ट मनोविकारांनी त्याचे उत्सर्जन होऊन ज्या स्वरूपांत दिसतो तसा नेहमीं शरीरांत असत नाहीं. मनोविकारांनीं उत्तेजित झालेल्या ज्ञानवाहकांनी शरीराची एक प्रकारची हालचाल होते व या धातूचा द्रव स्रवून त्याचवेळी वंक्षणानजीक असणा-या ग्रंथीपासून उद्भवणा-या स्रावाशी संयोग होतो व उत्सर्जित शुक्राचें हें संयुक्त स्वरूप असतें. असे हे सात धातु होत.

तीन मळ.

 मळ मुख्यत्वें तीन सांगितले आहेत. १ शकृत् किंवा पुरीष २ मूत्र व तिसरा स्वेद. या मळांविषयींहि आर्येदांतील वर्णन थोडया तात्विक दृष्टीने वाचावयास पाहिजे. तीन मळ म्हणजे मळ, मूत्र आणि घाम अशी प्रथमदर्शनी कल्पना होते. आणि कांहीं अंशी ती खरी आहे. परंतु उत्सर्जनयोग्य अशा घाणेऱ्या पदार्थांना शरीराचे महत्वाचे अवयव मानण्यांत येईल काय ? हा प्रश्न विचारणीय आहे. या मळाची देहधारणोपयोगी म्हणून जी कार्ये सांगीतली आहेत ती अशी -

अवष्टंभः पुरीषस्य मूत्रस्य क्लेदवाहनं ॥
स्वेदस्य क्लेदविधृतिः ॥

अ.हृ.सू.अ.11


  पुरीषाचें धारण करणें हें कार्य, मूत्राचें म्हणजे धातूंतील द्रवांश वाहणें है कार्य आणि स्वेदाचें कार्य हा केंद्र धारण करणे हैं आहे. हीं कामें स्थूल रूपाचे हे मळ कशी करूं शकतील ? अर्थात् मळांना जे देहधारणाइतके महत्व दिले आहे त्याला अनुसरून ह्यांचा अर्थ करणें जरूर आहे. आणि या दृष्टीने पाहतां पुरीषदि मळ हे सर्व देहांत व्यापी असे आहेत. शरीराच्या कोणत्याहि धातूचा अथवा घटकाचा कार्य करून झिजूं पाहणारा-थोड्या काळाने ज्याचे उत्सर्जन होणार अशा स्थितींतील जो घनभाग तो पुरीष किंवा शुक्त् होय. याचेमुळे उपयुक्त भागाचे संरक्षण होते. त्याचप्रमाणे प्रत्येक घटकाचे शारीरिक रसायनक्रियेने रूपांतर होत असतां प्रथम रसीभवन होतें-