पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६

हे पान प्रमाणित केलेले आहे.
थोडक्यात वस्तुबोध.

 प्र. ८:--प्रत्येक रोगाचे निदान ठरविताना आयुर्वेदाने या त्रिदोषांवर सर्व हवाला दिला आहे. एवढ्याने रोगज्ञान कसे होते ? उत्तरः--आयुर्वेदाने निदानशास्त्रामध्ये त्रिदोषांच्या केवळ स्थूल कल्पनेवर भिस्त ठेविलेली नाही. प्रत्येक रोगाची वेगळी संप्राप्ति (रोगोत्पत्तिक्रम) दिली आहे यावरून उघड होते. मात्र कोणत्याहि रोगामध्ये त्या रोगस्थानाची जी वास्तविक किया, तिची विकृति ध्यानी घेऊन रोगस्थानाची संग्राहक शक्ति विकृत झाली, पाचकशक्ति विकृत झाली की उत्सर्जक हे समजणे अवश्यक असते व याचा खुलासा अनुक्रमें कफ, पित्त आणि वायु या नांवांनी केलेला असतो. विकार असंख्य असले तरी त्यांचे स्वरूप तीनच प्रकारचे असावयाचे. याचे कारण अगदी उघड आहे. शरिराचा प्रत्येक घटक तीन प्रकारचेच व्यापार करतो. असल्या घटकांच्या समुदायाने विशिष्ट स्वरूप पावलेला अवयव तीनच प्रकारच्या क्रिया करतो. विकृति व्हावयाची तर चौथ्या कोणत्या क्रियेत होणार? रोगाचे स्थान, त्याचा पोटभाग, त्यांतील नैसर्गिक क्रिया यांतील विकृति समजून घेतांना विकृति म्हणजे ती कोणत्या नैसर्गिक व्यापाराची याचा बोध झाल्याविना रोगज्ञान व्हावें कसें? एकाद्या ठिकाणी संचय झाला हे कळले तरी संचय होण्याला अधिक संग्रह झाला उत्सर्जन झाले नाही की दोनहि अविकृत असून पचनच होत नाही याचा बोध झाल्याशिवाय रोगज्ञान कसे होणार ? हे कळावे म्हणून प्रत्येक रोगावर त्रिदोषाचा उपयोग केला आहे. व यासाठींचः--

दोषा एवहि सर्वेषां रोगाणामेककारणम् ॥

 सर्व रोगांचे मुख्य कारण दोष असा अभिप्राय आयुर्वेदाने दिला आहे.

 प्र० ९:--शरिरातील पदार्थामध्ये त्रिदोषांचे सोपें वर्णन कसे करतां येईल ? उत्तर--सर्व शरिरात एकंदर पदार्थ दोन जातीचे एक विनाशी आणि दुसरे अविनाशी हे आतां उघड झाले. पैकी अविनाशी दोष व विनाशी पदार्थांमध्ये दोन पोटभेद. एक उत्पन्न होत असलेले किंवा उत्पद्यमान भाणि दुसरे झिजत असलेले. यांना अनुक्रमें धातु आणि मळ ही नावे आहेत. एकूण हे शरिरातील तीन प्रकारचे पदार्थ होत. चवथा पदार्थ नाही. (दोषधातुमल मूलं हि शरीरम् ) या तीन पदार्थापैकी दोष हे सर्व क्रियाकारी किंवा कारक आणि दुसऱ्या दोन पदार्थाना धारक म्हणजे शरीर (धारण करणारे) अशी नांवें देता येतील. दुसन्या प्रकारचे पदार्थात जो भाग झिजका त्याला उत्सर्जनयोग्य म्हणून टाकाऊ या अर्थाने मळ नांव दिले आहे असा मळ एका