पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 सुक्ष्म अवयवांमुळेच शरीरघटकांची क्रांति नित्य चालते. असला एक भाग दोष व दुसरा जो उपाद्य तो धातु व त्याच धातूचा झिजका भाग म्हणजे मळ. मळ हे उत्पाद्य धतूचेच क्षीणसामर्थ्य असे अंश. अर्थात् त्यांत स्वतः सामर्थ्य नाहीं. धातु देखील उत्पाद्य म्हणजे ते परावलंबी व दोष हे उत्पादक, स्वतंत्र म्हणून त्यांना महत्वः पण दोष धातूंशिवाय राहू शकत नाहींत व धातूंची सुरक्षितता मळांवाचून राहत नाहीं, म्हणून या धातुमळांनाहि शरीरधारणाला तितकेच महत्व आहे. उत्पादनक्रियेमध्ये तीन पोटभेद, एक संग्रह, दुसरे पचन, व तिसरे उत्सर्जन. ह्या तीन क्रियांमुळे उत्पादक दोषांचे संग्राहक, पाचक व उत्सर्जक असे तीन भेद पडून तदर्थसूचक पित्त व वायु या नांवानी त्यांचा प्रचार झाला. उत्पाद्य पदार्थामध्ये अन्नरसापसून प्रथम रस धातू, त्यानंतर, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शेवटीं शुक्रामध्ये पर्यवसान होऊन त्यापुढें ही उत्क्रांति ( धातूची ) थांबते. हे जे दृश्य सात प्रकार शरीरांतील घटकसमुदायाचे त्यांचेच बनलेले शरीर म्हणून धातु या नांवानें त्यांचा उल्लेख व झिजक्या मळांत, घन, द्रव व बाष्पावस्थित असे असणारे तीन प्रकार शकृत्, मूत्र व स्वेद या नांवांनी आयुर्वेदाने त्यांचा उल्लेख केला आहे. आणि तीन दोष, सात धातु व तीन मळ असे एकूण तेरा पदार्थ शरीरांत मुख्य होत. शरीराचे ज्ञानामध्ये अंग-प्रत्यंगांचें ज्ञान व त्यांतील निरनिराळ्या क्रिया यांचे ज्ञान असावयास पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे. तथापि येवढ्यावर शारीरविज्ञान पूर्ण होत नसून अपरिसंख्येय परिमाणूंचा जीवनक्रमहि ज्ञात असावयास पाहिजे. अनेक जातींचा आहार जठरांत पचत असतांहि त्यांतील विविध परमाणु शरीराच्या विशिष्ट व सजातीय विभागावरच परिणामकारी होतात. हा एक शरीराचा धर्म म्हणून मानल्यावर शरीरांतील अणु आणि त्यांचे सधर्म बाह्य सृष्टीतील अणु यांचा संबंध कसा येतो हा विचार अवश्य आहे. शरीरांतील अणूशी त्यांचे तादात्म्य ज्या पद्धतीने आणि क्रमानें होतें ती पद्धति आणि क्रम आयुर्वेदांतील कफपित्तानिलांच्या व्यापक अर्थाने दाखविला आहे. शरीराची अंगप्रत्यंगे ज्या असंख्य अणूंचे समुदायानें तयार झाली त्याच अणूंच्या उत्पत्तिस्थितिविनाशावर या अंगावयवांची स्थिति अवलंबून असते आणि निरोगी अवस्थेत आहार्य पदार्थांतील सजातीय अणूंनी प्रथम या अणूंची उत्पत्ति व त्यांची सामुदायिक वाढ म्हणजे निरनिराळ्या अवयवांची वाढ त्याचप्रमाणे रोगावस्थाही याच अणूंचे आरंभक विकृतीपासून व पुनः सुधारणा हि यांचेपासूनच, उपचारांचा उपयोगहि याच उत्पादक भागावर अशा प्रकारची तर्क-