पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
आर्युवेदांतील मूलतत्वें.

 याची ठराविक मर्यादेपर्यंतच होणारी वाढ व सर्वसामान्य आयुष्यमर्यादा वाढविण्याला कोणत्याहि उपायानें न येणारे यश, या गोष्टी ध्यान घेतां शरीरांत न बदलतां आयुष्याचे अंतापर्यंत टिकणार। भाग असून त्यावरच शरीराच्या क्रिया अवलंबून आहेत ही गोष्ट सहज पटेल. असल्या पदार्थांना मुख्य मानून आयुर्वेदानें शारीरविज्ञानाचा या सूक्ष्म भागापर्यंत शोध केला आहे.
 सर्व पदार्थमात्राप्रमाणेच शरीर हा पांचभौतिक परमाणूंचा संयोग होण्याला या परमाणूंना प्रथम आकर्षून जवळ आणणे, नंतर स्थिर करणें व एकमेकांत मिश्र होण्यासाठी त्यांचें रसीभवन असा एक उत्पत्ति किंवा वाढीचे कार्याचा विभाग, त्यानंतर मिश्र पदार्थांचे पृथक्करण व त्यानंतर पृथक् ( सापेक्षतया ) राहण्यासाठी उत्सर्जन अशा प्रकारची विविध अवयवांनी वाढ होण्यांत तीन विभाग पडतात व हे तीन द्रव्याश्रयी, देहाश्रयी - उत्पादक अणूंचे भाग आयुर्वेदाने मानले आहेत. शरीराविषयीं-

" तत्र शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूतं पंचभूतविकारसमुदायात्मकम्, "

(च.शा. अ. ५


 पंचमहाभूतांच्या विकृति समुदायात्मक व चेतनेचा आधार असे. शरीर आहे.

" पंचमहाभूतशरीरिसमवायः पुरुषः "

( सु० शा० अ० १)


 पंचमहाभूतें व शरीरि म्हणजे आत्मा यांचा समवायस्वरूप पुरुष आहे, असे वर्णन केले आहे.

संयोगाद्वर्तते सर्व तदृते नास्ति किंचन ।

( च० श० अ० १ श्लो० ५२ ).


 संयोगामुळे सर्व राहते त्या शिवाय कांहीं नाहीं.
 पृथिव्यापस्ते जोवायुराकाशं ब्रह्मचाव्यक्तमित्येत एव षड्यातवः समुदिताः पुरुष इति शब्दं लभते ( चरक शा. अ. ५ ).}}
 पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश व अव्यक्त ब्रह्म हे सहा पदार्थ ( धातु धारणात् ) समुदित झाले म्हणजे त्यांना पुरुष ( देही ) संज्ञा प्राप्त होते.
 तत्र संयोगापेक्षा लोकशब्दः षड्धातुसमुदायो हि सामान्यतः सर्वलोकः ।
 षड्धातुविभागो वियोगः । स जीवापगमः सप्राणनिरोधः । स मंगः ॥ १ ॥