पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.



तात्विक वर्णन न करतां असले सामर्थ्य ज्या पदार्थात आहे त्या पदार्थांच्या स्वरूपाचे वर्णन सुरू होऊन त्यांचे नांवानें शास्त्रीय व्यवहार चालू झाला. एकाद्या क्रियेच्या संपादनासाठी अवश्य असणाऱ्या गुणसमुदायाचा पदार्थ व क्रिया यांना भाषेत बहुधा भिन्न स्वरूप राहत नाही. याच न्यायानें, शरीरांत उत्सर्जकशक्ति विकृत झाली असतां उत्सर्जक सामर्थ्य असलेल्या पदार्थांचे-वायूचे- नांवानें ही विकृति ओळखणे व अशा रीतीनें दोष व शरीर यांचा व्यवहार रूढ झाला व तसा होणे सायेचेहि असतें. त्यानंतर या व्यवहाराची व्याप्ति अशी वाढली की एका दोषाचे गुणसमुदायापैकी कोणत्या तरी एकाच गुणाचा हे त्या दोषाचे नांवाने उल्लेख होऊ लागला म्हणजे, रूक्षता वाढली, वातविकृति, मलोत्सर्जन नाहीं, वातविकृति, ठणका वातविकृति, कोरड पडते वातविकृति, कृशता वातविकृति, अशा रीतीनें निरनिराळे विकार त्यांची स्थाने व अवस्था यांमध्ये दोषांचा उल्लेख सरसहा होऊं लागला व कोणत्याहि विकाराचे विवेचन केवळ त्रिदोषांचे नांवानेंच होऊ लागले. व एक प्रकारें तें घोटळ्याचेहि भासावें यांत आश्चर्य नाहीं. परंतु त्रिदोषाचे स्वरूप व त्यांचें निरनिराळ्या शरीरभागांतील निरनिराळ्या गुणांचे स्वरूपाने अस्तित्व आणि वेगवेगळे कार्य ध्यानी आणून जर सामान्य दोषशब्दाचा विचार केला तर हा घोटाळा राहत नाहीं. आयुर्वेदाने रोगविज्ञानासाठी केवळ दोषांचा उल्लेख केला नसून त्यांचा निरनिराळ्या स्थानांतील संबंध ध्यानीं घेण्यास सांगितलें आहे.

' संचयं च प्रकोपं च प्रसरं स्थानसंश्रयं ॥
व्यक्ति भेदंच यो वेत्ति दोषाणां स भवेत् भिषक् ॥ १॥ सुश्रुत

  दोषांची वाढ, प्रसार, प्रकोप, स्थानाश्रय, भेद व रूप यांचे ज्ञान असेल त्यालाच वैद्य समजावें. या सूचनेनें निरनिराळ्या स्थानांतील नित्यव्यापार व त्यांत असणारा निरोगी स्थितींतील दोषांचा संबंध ध्यानांत आणून तदनुसार दोषविकृति याचा अर्थ करावयाचा हे स्पष्ट होत आहे. सर्व शरीराच्या सर्वसामान्य तीन क्रिया ज्या, संग्रह, पचन, उत्सर्जन त्यां पैकी कोणत्या क्रियेच्या विकृतीमुळे एकादा भाग रोगी झाला हे समजण्यासाठी त्रिदोषांचा उपयोग असतो. कोठ्यांत अजीर्ण झालें हें समजलें असतांहि, पचनशक्ति कमी झाली, अन्न अधिक झालें कीं मळाचें उत्सर्जन होत नाही याचा बोध झाल्याविना पाचक औषध द्यावें, उपवास करवावा की विरेचन द्यावे याचा बोध होत नाही. त्याचप्रमाणे या प्रत्येक अवस्थेत हि पुनः वातादींचे तीन प्रकार मानावे लागतात. अशासाठी कीं त्यामुळे विकृतीचा स्थानी परिणाम ध्यानांत यावा. जसें- पचनशक्ति कमी झाली, योग्यप्रमाणांत खाल्लेले नित्याचे संवयीचे अन्नपचन नाहीं असे अनुभवास आले व त्यावरून पचन कमी ही विकृति