पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५३
थोडे स्पष्टीकरण.


ध्यानी आली तरी, जठरांतील पाचकरस कमी झाला, की त्यांचे मिश्रण अन्नांत कांहीं तरी व्यत्यय आल्याने होत नाहीं. आंतड्यांत अभिष्यंद होऊन - आर्द्रता येऊन, जाठररसाचे वियोजनांत व्यत्यय येतो कीं आंतड्यांत कोरडेपणामुळे उत्पन्न झालेल्या स्रोतसांच्या संकोचामुळे व्यत्यय येतो याविषयीं ज्ञान होणे चिकित्सेला अवश्य असते व त्यासाठींच प्रत्येक रोगांत त्रिशेषांचा संबंध सांगितला आहे. रोगी भागाची स्थूलतया स्वरूपशः व नंतर क्रियाविषयक तपासणी केल्यानंतर आलेले क्रियावीष्यम्य कोणत्या मूळ क्रियेच्या विकृतीचे याचेंहि ज्ञान व्हावयास पहिजे. तरच तत्वतः विकृतीचे ज्ञान झाले असे म्हणतां येईल. म्हणजे रोगविज्ञानाला, शारीरविज्ञान तर पाहिजेच पण त्रिदोषवेज्ञान जर नसेल तर निदान, औषधीप्रयोगांचा तरी उपयोग करणे अशक्य आहे. कारण औषधांचे गुण शरीरांतील विभाग व त्या त्या विभागांतील कार्यकारी अणूंवर होणारा परिणाम यांना अनुसरूनच सांगितले आहेत.औषधाचा परिणाम सूक्ष्म भागावर होतो. (विशेष खुलासा पुढे करण्यांत येईल. )

प्रतिरोगमितिक्रुद्वा रोगाधिष्ठानगःमिनीः ॥
रसायनीः प्रपद्याशु दोषा देहे विकुर्वते ॥१॥ (अ.हृ. नि. अ. १ला.


आपापल्या कारणांनी कुपित झालेले दोष रोगस्थानांतील रसायनींमध्ये (सूक्ष्म वाहिनी ) प्रवेश करून रोग उत्पन्न करतात.

 दोषांचें रोगकर्तृत्व अशा प्रकारें सांगितले आहे प्रत्येक भागांत या सूक्ष्मवाहिन्या किंवा स्रोतसे असतात त्यांचेमध्ये चालणाऱ्या नित्याच्या रासायनिक क्रियेनेच शरीराची-घटकांची-घडामोड होत असते व याच भागांत स्रोतसांत कार्यकारी असे दोष असतात. असे आयुर्वेदाचे मत आहे.

" वातपित्तश्लेष्मणां पुनः सर्व शरीरचराणां स्रोतांस्यनभूतानि ॥ " (च.वि. अ. ५)

 याच भागांत प्रथम क्रिया सुरू होते. विकृति याच ठिकाणी व औषधांतील सजातीय अणुहि याच भागावर प्रथम परिणामी होऊन कार्य करतात. यामुळे त्रिदोषांना म्हणजे सार्वदेहिक स्रोतसांतून राहणान्या सूक्ष्म अशा कार्यकारी अणूंना महत्व देऊन शरीराच्या अविकृत अथवा विकृत अवस्थेत त्यांचाच विचार मुख्य मानला जावा यांत अनैसर्गिक असे कांहींच नाहीं.

त्रिदोषांचा क्रम कोणता ?

 त्रिदोषांचें सर्व विवेचन पाहतां त्यांत श्लेष्मा पित्त व वायु असा