पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४
आयुर्वेदांतील मूलतत्वें

 क्रम दिसतो. कारण श्लेष्म्याचें संग्रह किंवा संघटना हैं कार्यच देहाचा आरंभ आहे. व

विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्याानिला यथा ॥
धारयंति जगद्देहं कफपित्तानिलास्तथा ॥ १ ॥
नर्ते देहः कफादस्ति न पित्तान्न च मारुतात् ॥

 या वाक्यांत कफपित्तवायु असा क्रम स्वीकारला आहे. परंतु बहुतेक सर्व ठिकाणी विशेषतः निदान चिकित्साप्रकारणीं वायु पित्त कफ असाच क्रम स्वीकारलेला आहे, व वायूचें महत्वहि त्याचप्रमाणे वर्णिले आहे.

विभुत्वादाशुकारित्वाद्वलित्वादन्यकोपनात् ॥
स्वातंत्र्याबहुरोगत्वाद्दोषाणां प्रबलोऽनिलः ॥ १ ॥
पित्तं पंगुः कफः पंगुः पंगवो मलधातवः ॥
वायुना यत्र नीयंते तत्र गच्छंति मेघवत् ॥ १ ॥
अव्याहृतगतिर्यस्य स्थानस्थः प्रकृतिस्थितः ॥
वायुस्यात्सोऽधिकं जीवेत् वीतरोगः समाः शतम् ॥ १॥

  या वाक्यांनीं धातु मळ त्याचप्रमाणे कफपित्ताहून वायुरव तंत्र च श्रेष्ठ असल्याचे सांगितलें आहे.

वायुः पित्तं कपश्चेति त्रयो दोषाः समासतः । ( वाग्भट. सू. अ. १ )
वायु पित्तं कफश्चोक्त: शारीरो दोषसंग्रहः ॥ (चरक सू. अ. १ . ५६ )  अशा प्रकारें वायुपित्तकफांचा अनुक्रमच सर्वत्र आहे. व कफाचा उत्पादक या नात्याने महत्वाचा संबंध असतां तो मार्गे पडून कफाचे पूर्वी वायु कां यावा? असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो व त्याचा विचार करणें अवश्य आहे.
 याचें कारण असें आहे की उत्पादनक्रमामध्ये जरी दोषांपैकी कफ प्रमुख किंवा प्रथम असला तरी विकृतीचे प्रसंगीं मात्र वायूचेंच सामर्थ्य अधिक असते. शरीराच्या अनेकविध व्यापारांचा उगम नित्य चालणाऱ्या चलनवलनापासून होत असतो. गति-हाल चाल - हा मुख्य जीवनव्यापार आहे. हा व्यापार ' वायूचा हे ' स्पष्ट आहे. या हाल चालीमध्ये ज्यावेळी अडथळा-प्रतिबंध होतो त्यावेळीच रोगाला स्वरूप येत असतें. कित्येक विकारांत, कफामुळे उत्पन्न झालेला अभिष्यंद अथवा पित्तामुळे होणारा अभिताप ही वायूचे गतीला विधातक कारणे असतात. हे खरे असले तरी रोगाला स्पष्ट स्वरूप येण्याला कोठे तरी या गतीमध्ये व्याघाताची अवश्यकता असते.

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावतां ।।
यत्र संगः स्ववैगुण्यात् व्याधिस्तत्रोपजायते ॥१॥ (चरक)