पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय,वाई
१५५
दोष तीन की चार


क्षिप्यमाणः स्ववैगुण्यात् रसः सज्जति यम सः ॥ तस्मिन् विकारं कुरुते वर्षमिव तोयदः ॥ १ ॥ (अष्टांगहृदय.)  या लोकांमध्ये गति अथवा अभिसरण यांमधील अडथळा म्हणजेच रोग असा स्पष्ट अर्थ आहे. मागें सांगितलेच आहे कीं शरीरविकृती नंतर तें कां विकृत होते ? कोण दूषित करणारे या प्रश्नाचे उत्तर ह्मणून अविकृतावस्थेतील देहधारक वातादिकांनाहि दोष नांव देऊन त्यांची विकृति टाळण्याची सूचना देण्यांत आली ह्मणजे विकृति टाळणे आणि घालवणें हें ध्येय मानणाऱ्या वैद्यशास्त्राने रोगोत्पादक कारणांवर विशेष लक्ष ठेवणे अगत्याचें या न्यायानें अविकृतावस्थेत तत्वतः धारक असलेल्यांत श्लेष्मा प्रमुख पण दोषांत वायु प्रमुख मानणे सयुक्तिक होय. याच उद्देशानें " वायुः पित्तं कफश्चेति " अशा क्रमाचा प्रसार - ' फलंचास्य चिकित्सितं ' चिकित्सा हैं धेय मानणा-या आयुर्वेदांत झाला आहे 'व्याध्युपसृष्टानां व्याधिपरिमोक्षः स्वास्थ्यस्य रक्षणं च' (सुश्रुत) व्याधितांना रोगमुक्त करणे आणि गिरोग्यांना तसेच राखणें आयुर्वेदाचे ध्येय प्रसिद्ध आहे.

दोष तीन की चार ? रक्त हा चवथा दोष आहे काय?

 आयुर्वेदाचे वाङ्नयामध्ये क्वचित् तीन दोषांबरोबरीचे महत्व रक्तालाहि दिल्याचे आढळते. व त्यावरून दोष रक्तासह चार असावे असे मानण्याचा एक संप्रदाय आहे अष्टांगहृदयाचे सर्वांगसुंदरा व्याख्येमध्यें याविषयी शंकासमाधान चांगल्या प्रकारे केले आहे. ( अ. सं. सूर्य अ ० १ श्लोक ५ वरील व्याख्या. ) रक्त हैं सर्व शरीराचे पोषक आणि त्यावर प्रथम परिणाम होतो.
"तदेभिरे शोणितचतुर्थैः संभवस्थितिप्रलयेष्वप्यविरहितं -- शरीरं भवति ।

नतें देहः व फादस्ति न पित्तान्न च मारुतात् ॥
शेोणितादपिवा नित्यं देहएतैस्तु धार्यते ॥१॥ (सु.सु अ २१)

 सुश्रुतांतील या वाक्यांत त्रिदोषांबरोबरच रक्तालाहि महत्व दिलें आहे. दोषांप्रमाणेच रक्ताचें वर्णन स्थान विकार सांगितले आहेत.

अनुष्णशीतं मधुरं स्निग्धं रक्तं च वर्णतः ॥
शोणितं गुरु विस्रंस्याद्विदाहश्चास्यपित्तवत् ॥ १॥

 समशीतोष्ण, मधुर, स्निग्ध, वर्णाने लाल, जड, आमगंधि असें रक्त असून त्याचा विदाह पित्ताप्रमाणे होतो.

शोणितस्य स्थानं यकृत्प्लीहानौ तश्चप्रागभिहितम् ।
तत्रस्थमेव शेषाणां शोणितस्थानानामनुग्रह करोति ।