पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६
आयुर्वेदांतील मूलतत्वें।

  रक्ताचे स्थान यकृत् आणि प्लीहा मुख्य असून तेथेच राहून इतर रक्तस्थानांना ते मदत करते. (सु. सू. अ. २१ )

 अशा प्रकारें रक्ताचें स्वतंत्र वर्णन विशेषतः सुश्रुतांत आहे. तरी देखील रक्ताच्या विकृतीमध्ये वातादीचे संसर्गामुळे भेद सांगितले असून तदनुसार उपचारामध्ये भेद आहेत. यावरून रक्ताचें स्वातंत्र्य नष्ट होते.

यस्माद्रक्तं विना दोषैर्न कदा चेत्प्रकुप्यति ॥
तस्मात्तस्य यथादोषं कालं विद्यात्प्रकोपणं ॥१॥

 दोषांशिवाय रक्त प्रकुपित होत नाहीं म्हणून दोषांना अनुसरून त्याचे कोपाचा काळ समजावा. (सु. सू. अ० २१ )

 कोणत्याहि रोगामध्ये त्रिदोषविकृतीला अनुसरूनच संप्राप्ति सांगितली आहे तसा रक्ताचा उल्लेख नाहीं. द्रव्याचे गुणधर्म सांगतांना त्यांतील रसामध्ये त्रिदोषांचा प्रकोपप्रशम सांगितला तसा रक्ताचा नाहीं.

( चरक विमानस्थान अध्याय १ ला यांत वर्णन आहे.)


कांहीं रक्ताश्रयी विकारांवर स्वतंत्र चिकित्सेचा बोध होण्यासाठी व इतर धातूंपेक्षां रक्त हैं सर्वगामी, अधिक प्रसरणशील म्हणून त्याची विकृति सर्व शरीरहि विकृत करूं शकेल, शुद्ध रत्तांनेच सर्व धातूंची वाढ या कारणांनी त्याला इतर धातूंपेक्षां महत्व दिले तरी त्यामध्ये स्वतः सामर्थ नाही व म्हणून तें दोषांमध्ये समाविष्ट होणारे नाहीं. रक्त, धातु आणि दृष्य याच खरूपाचे असावयाचे म्हणजे दोप हे तीनच ठरतात ' त्रयो दोषाः ' हा सिद्धांत अबाधित आहे.

______
त्रिदोषासंबंधीं गैरसमज.

 त्रिदोषांसंबंधी आयुर्वेदाच्या उपपत्ति ध्यानी न घेतां कांहीं तरां गृहीत कल्पनांवर नसते आरोप करण्यांत येतात. याला एक कारण जसे पूर्वग्रहदूषित व संभ्रमात्मक कल्पना तसेच दुसरें कारण त्रिदोषांच व्यवहारांत शारीरविज्ञानाकडे दुर्लक्ष्य हैंहि असेल. वाताचा विकार या स्वसामान्य संदिग्ध ज्ञानानें रोगज्ञान होत नाहीं भसी स्पष्ट आयु- वेदांत उल्लेख असतां दोप दूष्य व त्यांचे अंशांश, स्थानविभाग प्रसार- स्थानाश्रय इत्यादि गोष्टी ध्यानी घेण्याचा आग्रह असतां असल्या संदिग्ध ज्ञानावर विश्वास ठेवणे व हेंच आयुर्वेदाचें तत्वज्ञान मानणे दोनहि अज्ञानाची निदर्शकच होत. निदानशास्त्रांत ज्याअर्थी आयुर्वेदाने संचय, प्रकोप आणि प्रसार व स्थानाश्रय यांचा समावेश केला आहे त्या अर्थी शरीरांचे विभाग, रचना, कार्य व अन्योन्यसंबंध यांचे ज्ञान