पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

बाजूने व कारक असे दोषांचे दुसऱ्या बाजूने धारण करतो. म्हणून या शरिरांतील नवीन बनणाऱ्या उत्क्रांति पावणाऱ्या पदार्थाला योग्य अर्थाचे धातु हे नांव दिल आहे. (धारणात् धातवः) कारक खरे पण यांत विकृति झाल्याने सर्व शरीर बिघडते. म्हणजे बिघडविण्याची क्रिया हे करतात. ह्मणून यांना आयुर्वेदांत त्रिदोष हे नांव दिले आहे. वैद्यशास्त्राचा जन्म रोग जन्मानंतर झाला म्हणजे वैद्यशास्त्राला प्रथम प्रश्न बिघडवितो कोण हा करावा लागला. व त्यामुळे कर्तृत्वसंपन्न अशा शारीर घटकांतील अणूंना दोष नांवाने ओळखण्याचा संप्रदाय प्रचारांत आला. (दूषणात् दोषाः) असे शरिरांतील मुख्य तीन पदार्थ आहेत. सामर्थ्यसंपन्न अणूचे भेद तीन, दोष-धातु सात व मळ तीन. एकूण तेरा पदार्थ. यांचा दोष धातु मळ या तीन पदार्थात अंतभर्भाव होतो.
 धातु स्थूल व सामर्थ्ययुक्त पदार्थ, मळ स्थूल व सामर्थ्यहीन पदार्थ आणि दोष सूक्ष्म आणि क्रियारूप पदार्थ असे यांचे वर्णन करता येईल. शरीराचे घटकांतील कार्यकारी आणि सूक्ष्म असे अणु म्हणजे त्रिदोष समजावे. हे अणु म्हणजे शारीर घटकांचा अविनाशी आणि स्थिर भाग. अर्थात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाही.
 प्र० १०:--वायु पित्त कफांना व्यावहारिक भाषेत कोणत्या बोधक नावांनी ओळखावें ? उत्तरः-वायु, उत्सर्जक किंवा वियोजक. पित्तपाचक किंवा विभाजक आणि श्लेष्मा संधायक किंवा संयोजक या नांवानी बोध होईल. या क्रियांचा आयुर्वेदांत उल्लेख आहे. मागे सांगितल्याप्रमाणेच नांवांनीच बोध होतो.
   शिवाय

विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्या निला यथा।
धारयति जगद्देहं कफपित्ताऽनिलास्तथा ॥१॥

 विसर्ग-संग्रह-संश्लेष किंवा संयोग, आदान-पचन सात्मी-करण, पृथक्करण किंवा विभाजन आणि विक्षेप फेकणे, उत्सर्जन किंवा वियोजन, या क्रियांनी अनुक्रमें कफ, पित्त आणि वायु हे ज्याप्रमाणे याच क्रियांनी सोम, सूर्य व वायु जगाचें धारण करतात त्याप्रमाणे शरीराचें धारण करितात. कफ किंवा श्लेष्मा, संघटना करणारा. पित्त पचन करणारे व वायु उत्सर्जन करणारा म्हणून शरिरात प्रमुख आहेत.


--------------------