पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५९
रोग म्हणजे काय ?

 असतात तर कांहींत असत नाहींत, कांहीं रोग झाले असतां त्यांचा परिणाम आणखी रोग उत्पन्न करण्यांत होतो, कांहीं तसे नांहींत असे अनेक प्रकारचे रोग तीन दोषांनी कसे समजून घ्यावयाचे ? तीन दोष व अनेक स्थानांत अनेक विकार यांचा संबंध कसा येतो ? याविषयीं आयुर्वेदाची पद्धति काय आहे पाहू.

__________
रोग म्हणजे काय ?

 प्रथमतः आयुर्वेदाने रोगाविषयीं काय व्याख्या केली आहे या विषयीं विचार करावयास पाहिजे. “रोगस्तु दोषवैपम्यं " रोग म्हणजे दोषांचें वैषम्य होय. अशी रोगाची व्याख्या आहे. दोषांमध्ये वैषम्य येणें म्हणजे त्यांच्या नैसर्गिक क्रियांमध्ये अनियमितपणा येणे. दोषांच्या न्यून्याधिक्याला वैषम्य मानण्यांत येते. परंतु अशा अर्थानें पूर्णता येत नाहीं. दोषांचे प्रमाण हें मर्यादित नसून ते शरीराच्या प्रमाणावर अवलंबून असतें. " दोषधातुमलादीनां परिमाणं न विद्यते. " (चरक.) दोष, धातु, मळ इत्यादि पदार्थांना ठराविक प्रमाण असत नाहीं. कोणी -हस्व, तर कोणी दीर्घ, कोणी स्थूल कोणी कृश, कोणी मांसल तर कोणी मांस कमी असणारा, कोणी कृष्णवर्णाचा कोणी गोरा, अस्थिसार, मांससार, शुक्रसार, वातप्रकृति, पित्तप्रकृति, कफप्रकृति इत्यादि सहज जो शरीरधर्म त्यामध्ये " व्यक्ती तितक्या प्रकृति " या न्यायानें दोषांदीचे प्रमाण भिन्न असावयाचें. आणि या जन्मादारभ्य असणाऱ्या प्रमाणभिन्नत्वाला किंवा न्यूनाधिक्याला रोग नांव दिल्यास सर्वच रोगी मानण्याचा अनवस्थाप्रसंग येईल. त्याचप्रमाणें वयोमानानुसार वाढणाऱ्या आणि जरेनें जीर्ण होणाऱ्या शरीरामध्ये दोषधातुमलांचे प्रमाण बदलतेंच राहते. इतकेंच काय ? पण एकाद्याला पोषणाभावी अथवा एखाद्या आजारामुळे वगैरे सार्वदेहिक क्षीणता येते व पुनः ती जाते. म्हणजे या दोनही अवस्था रोग नव्हेत. रोगामध्यें प्रमाणभिन्नता है तत्व नसून विषमता म्हणजे त्यांच्या क्रियांमध्ये विरुद्धता उत्पन्न होणें हें तत्व आहे. " विषमता स्वरूपात च्यावः " " दोषाणां साम्यं स्वरूपात् अप्रच्युतिः ।" दोषांची विषमता म्हणजे स्वरूपभ्रष्टता, आणि साम्य ह्मणजे ते स्वभावापासून भ्रष्ट न होणे, ही सर्वांगसुंदरा व्याख्येंतील, रोगव्याख्या मार्मिक आहे.
 सर्व शरीराची क्षीणता अथवा वृद्धि म्हणजे त्यांतील दोषांची क्षीणता आणि वाढ म्हणजे वैषम्य अगर रोग नव्हे; त्याचप्रमाणे एकाद्या भागाची अथवा एकाद्या पदार्थाची वृद्धि अथवा क्षीणताहि रोग नव्हे. तर विषमता अर्थात् " अनैसर्गिकपणा " हा रोग होय. म्हणजे