पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 दोषवैषम्य याचा अर्थ क्रियावैषम्य असा उघड होतो. ज्या ठिकाणी जी नैसर्गिक क्रिया घडावयाची ती न घडतां भलतीच क्रिया घडते त्या वेळी रोग होतो. यासाठींच दोषांची वृद्धि, क्षय यांचीं लक्षणें सांगून त्याशिवाय कोपाची एक अवस्था सांगितली आहे. आणि हीच अवस्था रोगकारण असत्याचा उल्लेख आहे वृद्धिक्षयांमध्ये रोगकर्तृत्व नाहीं. मात्र अवस्था कोपावस्थेय उत्पन्न करूं शकतात. त्यातही क्षीणावस्था ही रोगकारक नाहीं. कारण जो पदार्थ क्षीण अथवा क्षीणसामर्थ्य झाला त्यामध्ये कोप संभवनीय नसतो. म्हणून कोणत्या तरी दोषाचा संचय व त्याचा प्रकोप आणि त्यापासून रोग असा क्रम सांगण्यांत आला आहे.
 शरीर निरोगी स्थितीत असतां सर्वत्र योग्य प्रमाणांत संग्रह, पचन व उत्सर्जन या क्रिया चालतात, आणि ज्या वेळी एका अथवा अनेक शरीरभागांत अनैसर्गिक संग्रह, पचन आणि उत्सर्जन होईल त्या वेळीं रोग होतो. शरीरामध्ये ज्यावेळी कोठें संग्राहादि कार्यांचा अतिरेक होतो त्या वेळी त्याचा परिणाम दुःखकारक होतो म्हणून "रुजंति इति रोगाः " पीडा देणारे या अर्थाने रोग या शब्दाने या अवस्था संबोधण्यांत येऊ लागल्या. पीडा ज्या ठिकाणी होते तेथील क्रियावैषम्याचे ज्ञान हेच रोगज्ञान होय. अर्थातच रोगस्थानीय क्रियावैषम्य ध्यानीं येण्याला त्या स्थानांतील नित्य क्रियांचे ज्ञान अवश्य होय. आणि शरीराचे विविध भागांतील अनेकविध नित्य क्रियांचे ज्ञानाला त्या त्या स्थानाचे स्थूलतया रचना आकार, पदार्थ, स्वरूप यांचे ज्ञानहि असावयास पाहिजे. या ज्ञानाला शरीरेंद्रियविज्ञान या नांवाने संबोधण्यांत येतें. शारीरविज्ञान आणि इंद्रियविज्ञान यांचे अभावी दोषविकृति अथवा क्रिया यांचा योग्य खुलासा होणारा नाही. निदानशास्त्रामध्ये स्थूलतया त्रिदोषविज्ञान अपुरे असून त्यांचें विशिष्ट स्वरूप व स्थानानुरूप कार्य यांचा बोध नीट व्हावयास पाहिजे. स्थानविशिष्ट दोषविकृती किंवा विशिष्ट स्थानांतील क्रियावैषम्य रोगकारक असल्यानें आयुर्वेदाने निदानाविषयीं दोषांचा प्रकोप आणि स्थानसंश्रय यांना प्राधान्य दिले आहे .प्रकोप म्हणजेच क्रियावैषम्य समजावयाचें. प्रकोराची व्याख्या अशी आहे कीं,

कोपस्तुमार्गगमिता
लिंगानां दर्शनं स्वेषामस्वास्थ्यं रोगसंभवः ।

 कोप म्हणजे उन्मार्गगामिता होय. ही झाल्यावर त्या दोषाची लक्षणे व रोग होतात. उन्मार्गगामिता म्हणजे अयोग्य मार्गाने प्रवृत्ति होणे. असली उन्मार्गप्रवृत्ति होण्याला प्रथम अतिरिक्त संचय व्हावयास