पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

  दोषांचा संचय, प्रकोप, प्रसार, स्थानसंश्रय, रोगाची स्पष्टता आणि त्याचे त्याचे भेद जाणतो त्यालाच वैद्य ह्मणावे.
 याप्रमाणे रोगस्थान, त्यांत होणारा उन्मार्गप्रवृत्त दोषाचा संचय, हा उन्मार्गप्रवृत्त दोष कोठून कोठून उन्मार्गगामी झाला, त्याचा प्रसार कोणकोणत्या भागांतून झाला इत्यादि समजणे रोगज्ञानाला अवश्य आहे. थोडक्यांत याचा अर्थ असा कीं, विकृतीच्या आरंभाचें स्थान, त्याच्या रोगरूपी परिणामाचें स्थान व या दोन स्थानांचे मध्यवर्ति शरीरावयवांवर प्रसाराचे वेळीं घडणारा परिणाम इतक्या गोष्टी विचारांत घेतल्या असतां रोगज्ञान होते. कांहीं रोगांत विकृति किंवा दोषवैपम्य आणि रोगस्थान एकच असावें आणि कांहीं विकारांत हीं दोन स्थानें भिन्न असावीत याचे कारण स्थानी सामर्थ्याची न्यूनाधिकता असते. एकाद्या शरीरभागांत नैसर्गिक क्रियांमध्ये विषमता आणि त्यायोगें जरी एकाद्या अनैसर्गिक पदार्थाचा संचय झाला तरी तो शरीरभाग सामर्थ्यसंपन्न असल्यास असल्या अतिरिक्त, अनैसर्गिक, किंवा दूषित पदार्थाला आपल्या सामर्थ्याने बाहेर टाकून स्वतः सुरक्षित राहतो. अशा रीतीनें उम्मार्गगामी दोष (दूषित पदार्थ ) प्रसार पावत असतां ज्या एखाद्या सामर्थ्यहीन भागाकडून त्याचे उत्सर्जन होऊं शकत नाहीं तेथे त्याचा संचय होऊन दूषित पदार्थाच्या संयोगाने त्या भागांतील पदार्थहि दूषित होतात व मग हा दूषित संचय फार झाला की त्याच्या प्रतीकाराकरता शरीराचे प्रतिकारी सामर्थ्य या विशिष्ट भागांत एकवटतें. तेथील नित्य व्यापार बंद ( बरेच कमी) होतात. व मग तेथे सर्वच अनैसर्गिक क्रिया उत्पन्न होतात यालाच रोग हैं नांव आहे. (रोग- प्रतिकारी सामर्थ्याविषयीं पा. १०६ पहा.) रोगस्थानीय वैगुण्याला आणि त्यामुळे होणाऱ्या उन्मार्गप्रवृत्त दोषाचे संचाराला रोगविज्ञानांत महत्त्व दिले आहे:-

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावतां ।
यत्र संगः स्ववैगुण्याव्याधिस्तत्रोपजायते ॥ १ ॥ (चरक )


दोष कुपित होऊन त्यांचा शरीरांत प्रसार चालू असला तरी ज्या ठिकाणीं स्थानवैगुण्य उद्भवलें तेथे त्या दोषाचा संग होतो आणि त्याच जागी रोग होतो हैं जें स्थानी वैगुण्य आलेले असतें त्याचें कारण अनेक प्रकारचे असू शकेल. कोणत्या तरी कारणाने एकाद्या स्थानांतील शक्ति क्षीण होते व तेथे रोगाला स्पष्ट स्वरूप प्राप्त होते. यासाठी रोगाचे ज्ञानाला, विकृतीचें आरंभस्थान व त्याचा परिणाम रोगरूपाने होतो तें स्थान, यांचा बोध व मग विमार्गप्रवृत्त दोषाचा भेद कळला कीं सामान्यतः रोगाची माहिती होते. ज्या दोषांच्या प्रकोप, प्रसर-स्थानाश्रयावर रोगज्ञान अवलंबून आहे त्यांचें निरनिराळ्या रोगस्थानांतल-