पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 उपक्रम्य म्हणजे चिकित्स्य जो देह तो मुख्यत्वें दोनच प्रकारचा म्हणजे कृश आणि स्थूल या दोनच स्वरूपाचा असल्याकारणानें चिकित्साहि दोनच प्रकारची आहे. एक संतर्पण किंवा बृंहण आणि दुसरी अपतर्पण किंवा लंघन. अनुक्रमें हे उपचार शरीराला पुष्टि आणि लाघव ( कृशता ) आणतात म्हणून हीं नांवें आहेत. (अ. हृ.)

 यावरून बृंहण हा उपचार मानून वृद्धीप्रमाणे क्षयहि रोगोत्पादक मानण्यांत येतो. ( कांहिंजणांकडून ) परंतु ही चूक आहे. कारण लंघन बृंहण है देहाचें दोषांचं नव्हे. देह कृश झाला असतां, क्षीण झाला असतां वायु हा दोष वाढलेला असतो. आणि अशा अवस्थेत वातरोग होतात. त्यांवर वाढलेल्या वातावरील उपचार करावयाचे असतात. कृशता हा रोग नसून तीमुळे वायु वाढून रोग करूं शकतो. व बृंहणानें वृद्धवायु कमी होतो. बृंहणं शमनं त्वेव वायोः । बृंहण हे वायूवरील शमन, अर्थात् वाढलेल्या वायूचें लंघनच आहे. असा उल्लेख हि याकतांच आहे. रोगोत्पादक दोष आहेत. ते कोणत्या अवस्थेत रोग करतात हा महत्वाचा मुद्दा असून निदानशास्त्रांत विशेषतः विचारणीय आहे. आणि त्याचे उत्तर दोष वाढल्यावर विकारकारी होतात क्षीणावस्थेत नव्हे असें आहे. मग ही वाढ तत्वतः झालेली असो अथवा दुसन्या दोषाचे क्षीणावस्थेशी सापेक्षतया झालेली असो. कित्येकवेळी क्षीण दोषाच्या अवस्थेमध्ये विकार झालेले असतात. परंतु ते क्षीण दोषाचे नसून त्याचे उलट गुणाच्या दोषाचे सापेक्ष वाढीने झालेले असतात हैं ध्यानी ठेवणे अगत्य आहे. " रोगस्तु दोषवैपम्यं " दोषांचे वैषम्य हणजे वृद्धिक्षयावरून हैं वैषम्य व त्यालाच रोग मानतांना क्षयहि रोगावस्था मानण्यांत येत. परंतु वैषम्य याचा अर्थ केवळ वाढ किंवा केवळ -हास असा नसून सापेक्षतया वाढ आणि -हास म्हणजे तीन दोषांच्यामध्ये नैसर्गिक क्रियाप्रवर्तनाला अवश्य जे एक प्रमाण त्यामध्ये वैषम्य येणे असा वैषम्य शब्दाचा तत्वतः अर्थ आहे. आणि असल्या वैषम्यामध्ये क्षीणसामर्थ्य अशा दोषापासून विकार होत नसून त्याच्या उलट वाढलेल्यांचे विकार होतात ही गोष्ट ध्यानी घेऊन रोगसंप्राप्तीचे निरीक्षण करावयास पाहिजे. प्रतीकार वाढलेल्यावर असतो. प्रतिकार अथवा चिकित्सा व्यावर करावयाची तो दोष क्षीण नाहीं तर वृद्धच असतो याविषयीं मतभेदाचें कारण नाहीं. रोगारंभक विकृतीशी दोषांचा संबंध विचारांत घेतानां ते वाढलेले असतात व वाढ पदार्थस्वरूपाची असते या दोन गोष्टी ध्यानी घेणे अगत्य आहे. ( मार्गे पाचक पित्ताचे वर्णनांत पित्ताचे दूषित स्वरूपाविषयीं खुलासा पहा. ) दोषांचे शुद्ध व सूक्ष्म असे स्वरूप व रोगोत्पादक नसून ते देहधारक आहे आणि ही