पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदातील त्रिदोष.



आयुर्वेदांतील त्रिदोष.

वायुः पित्तं कफश्चेति त्रयो दोषाः समासतः।
विकृताऽविकृता देहं नंति ते वर्तयति च ॥१॥

  सर्व शरीत वायु, पित्त आणि कफ हे मुख्य दोष (चालक शक्ति) आहेत. हे दोष विकृत झाले असतां शरीरांत विकार उत्पन्न करून त्याच्या नाशालाहि कारण होतात. अणि तेच दोष जर निर्विकार असतील तर शरीराचे आरोग्य कायम राखून त्याची योग्य प्रकारे वाढ करितात. (अ. हृ. सू. अ. १)

 आयुर्वेद किंवा आर्यवैद्यक या चिकित्साशास्त्राची उभारणी त्रिदोषावर केली आहे. आयुर्वेदातील 'स्वास्थ्यसंरक्षण' आणि ' रोगनिवारण' हे दोनही प्रमुख भाग त्रिदोषमय असून कोणत्याही गोष्टीचा खुलासा या त्रिदोषांचे मदतीनेच केला आहे. हे दोष आयुर्वेदांत इतके भरले आहेत की, आर्यवैद्यक आणि त्रिदोष यांना पृथक् करूं म्हटले तर ते अगदी अशक्य आहे. वातादि त्रिदोष आणि आर्यवैद्यक यांचे अस्तित्व परस्पर सापेक्ष आहे. आयुर्वेदाचे लक्षण काय असे कोणी विचारल्यास संक्शेपत: उत्तर देणे तर दोपमयत्वं आयुर्वेदत्वं ज्या शास्त्रांत सर्वत्र दोषांवर--वायु, पित्त आणि कफ या तीन तत्वांवरच सर्व विवेचन अवलंबून आहे त्याला आयुर्वेद अगर आर्यवैद्यकशास्त्र म्हणावें, असें देता येईल. आणि या सदोषत्वामुळेच की काय नकळे आयुर्वेद सद्यःकाली आदरणीय वाटत नाही. सदोष शास्त्र कोण स्वीकारील ? एका काळी आयुर्वेदाने 'स्वास्थस्य रक्षण व्याधितानां व्याधिपरिमोक्षश्च, निरोग्यांचे आरोग्य रक्षण करणे आणि रोग्यांना रोगमुक्त करणे. या आपल्या उद्देशाप्रमाणे लोकोपकाराचे काम उत्तम केले असेल, पण तो काल समाजाच्या बाल्यावस्थेचा असल्यामुळे, त्यावेळी शास्त्रीय सुधारणा आजच्यासारखी परिणतावस्थेला पोचली नव्हती म्हणून त्यावेळी जे शास्त्र उत्तम म्हणून गणले गेले तेच सर्व शास्त्रे आणि कला यांची पूर्ण सुधारणा झाली असता सध्या आदराला पात्र कस व्हावें? प्रत्यक्षप्रमाणाच्या सबळ पुराव्याने त्यांतील तत्व सिद्ध झाली आहेत, व ज्यांतील विवेचन हेतुपुरःसर स्पष्ट आणि सविस्तर केले आहे, अशा पाश्चात्य वैद्यकापुढे काल्पनिक त्रिदोषांच्या लटपटित पायावर रचलेले व ज्यांतील विवेचन संदिग्ध आणि घोटाळ्याचे आहे अशा प्राचीन आयुर्वेदाला मान न मिळाल्यास नवल नाही. प्राचीन आयुर्वेदप्रवर्तकांनी शारीरविषयक आपल्या अज्ञानावर हे काल्पनिक त्रिदोषांचे आवरण टाकून लोकांना चकविण्याचा प्रयत्न केला. आणि 'अज्ञानतमः समीकृत सत्यासत्य' अशा त्या युगांत जरी तो यशस्वी