पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६७
( १ ) ज्वर



( १ ) ज्वर.

 ज्वर हा सर्वांना महशूर असलेला विकार आहे. आयुर्वेदामध्ये याची प्राप्ति दिली आहे ती अशी (संप्राप्ति ह्मणजे रोगाची उत्पादक विकृति क्रम वगैरे) आमाशयांत कुपित झालेले दोष जठराग्नीला बाहेर काढून रसाबरोबर फिरत असतां ज्वर उत्पन्न करतात.

मिथ्याऽहारविहाराभ्यां दोषा ह्यामाशयाश्रयाः ॥
बहिर्निरस्य कोष्ठांग्निं ज्वरदा स्थू रसानुगाः ॥ १ ॥ ( मा० नि० )
आमाशयं प्रविश्याममनुगम्य पिधायच ॥
स्रोतांसि पक्तिस्थानाच्च निरस्य ज्वलनं बहिः ॥ १ ॥
सह तेनाभिसंर्पतस्तर्पंर्तः सकलं वपुः ॥
कुर्वंतो गात्रमत्युष्णं ज्वरं निर्वर्तयंति ते

 अर्थः- अव्यवस्थित आहारविहारांनी आमाशयांत उत्पन्न झालेले दोष कोष्ठाग्निंला बाहेर घालवून रसानुगामी होत्साते ज्वर उत्पन्न करतात. ( मा. नि० )
 दोष आमाशयांत प्रवेश करून, आमांत मिश्र होऊन, स्रोतसे बंद करून, पचनस्थानांतून अग्नीला बाहेर घालवून, त्या सहवर्तमान सर्व शरीरांत फिरून शरीराला त्रास देणारे असे सर्व शरीर अत्यंत उष्ण करतात व अशा रीतीनें ज्वर हा रोग उत्पन्न करतात. (अ० हृ० )
 ज्वर या विकाराचा दोघांशी हा असा संबंध सांगितला आहे. यावरून त्रिदोषपद्धतीचे आधारे शारीरविकृतीचा स्पष्ट खुलासा कसा होतो पाहू. प्रथमतः ज्वराचे अगदीं साधे व सहज कळण्यासारखें स्वरूप म्हणजे विशेषतः त्वचेत व सर्वांगांतहि उष्णता वाढणें हें असून कोणालाहि कळते. ही जी उष्णता वाढली ती कशी वाढली, कोठुन आली तिचे स्वरूप काय याचा खुलासा वैद्यशास्त्राने करावयाचा. त्वचेमध्यें जें एक ठराविक उष्णतामान असतें त्याहून त्याची वाढ होण्याला साधन काय ? याचे उत्तर आयुर्वेदांतील वरील ज्वराचे संप्राप्तीमध्ये आहे आयुर्वेदाच्या त्रिदोषद्धतीमध्ये त्वचा है एक पित्ताचें स्थान, त्याचप्रमाणें त्वचेखालील स्वेद हैंहि पित्ताचे स्थान आहे. म्हणजे त्वचेमध्यें उष्णता किंवा पित्त असतें ही गोष्ट पित्तस्थानांचा निर्देश करीत असतां सांगितली आहे. या त्वचारूपी स्थानांत पित्ताची वाढ होते. कारण पित्त आणि उष्णता हे दोनहि शब्द एकाच अर्थाचे प्रतिपादक आहेत. आणि उष्णता वाढते अर्थात् पित्त वाढतें ह्मणजे 'त्वचे मध्ये पित्ताची वाढ ज्वरामध्ये झालेली असते. याच उद्देशानें:--

उष्मा पित्तादृते नास्ति ज्वरो नास्त्युष्णणा विना ॥

  ज्वर उष्णतेशिवाय नाहीं. आणि उष्णता पित्ताशिवाय नाहीं. अशा रीतीनें ज्वर या विकाराचें उत्पादकत्व पित्ताकडे आलें. ज्वराचें स्थान