पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९
( १ ) ज्वर



कोपस्तुन्मार्गगामिता ।

 उन्मार्गगामिता ज्या दोषामध्ये उत्पन्न व्हावयाची त्याचा नैसर्गिक मार्ग कांहीं तरी कारणाने रुद्ध व्हावयास पाहिजे; एरवी तो उन्मार्गगामी होण्याचें कारण नाहीं हेंहि न सांगतां कळण्यासारखे आहे. अशी अवस्था म्हणजे कोणत्या तरी दोषाचा नित्याचा मार्ग रुद्ध होऊन त्यामुळे उन्मार्गप्रवृत्ति होणें अशी अवस्था-आमाशयामध्ये कोणत्या दोषांत आल्याने ज्वर निर्माण होईल. याचें उत्तर वरील वर संप्राप्तीचे प्रकरणांत असलेल्या लोकांमध्ये आहे तें हें कीं, --

बहिर्निरस्य कोष्ठग्निं ॥ मा० नि०
पक्तिस्थानाच्च निरस्य ज्वलनं वहिः [ अ. हृ. ]


या वाक्यांनी पचनस्थानांतून पाचकाग्नीला बाहेर घालवून ज्वर उत्पन्न करतात (दोष) असे सुचविलें आहे. अर्थात् उन्मार्गावस्था पाचक अग्नीची म्हणजे पाचक पित्ताची झाली. जे पाचक पित्त अन्नांत स्त्रवून पचनाचें कार्य करणार त्याचा योग्य मार्ग म्हणजे पच्यमानाशय अथवा लहान आंतडे यांतील अंतर्मुख (आंत वाहणारी) जीं स्रोतसे तो होय. हा नैसर्गिक मार्ग अजीर्णजन्य दोषांनी बंद झाला. अजीर्ण असल्या स्निग्ध, शीत पदार्थांच्या संसर्गाने आंतडयाचा अंतर्भाग, अभिष्यन्न- (क्लिन्न - ओलसर - फुगीर - सुजीर) झाला व त्यामुळे स्रोतसें बदं झाली व त्याचा परिणाम असा झाला कीं या स्रोतसांतून आंत पाझरणारें पित्त स्त्रवू शकले नाहीं व तें समीपवर्ति अशा अन्नरसवाहक स्रोतसांतून रसाबरोबर बाहेर पडून त्याचबरोबर शरीरांत फिरू लागले. (स्रोतसें सर्वत्र व अंतर्बहिर्भागी असल्याचा उल्लेख मार्गे आहे. पहा. पा. ७५)

 वर दिलेल्या संप्राप्तीमध्ये " पिधाय स्रोतांसि " स्रोतसें बंद करून आणि " रसामुगाः सह तनाभिसर्पतः । " म्हणजे दोष रसानुगामी होऊन (मा. नि., अ.हृ. ) त्या उन्मार्गगामी पाचकाग्नीसहवर्तमान फिरणारे असे, असा उल्लेख आहे तो याच अर्थाचा होय. व या उल्लेखावरून स्रोतोरोध पित्तवाही स्रोतसांचा व कोप अथवा उन्मार्गगामिता पित्ताची, आणि या उन्मार्गप्रवृत्त पित्तामुळेच ज्वर हा रोग उत्पन्न होतो या गोष्टी उघड झाल्या. यामुळेच 'उष्मा पित्तादृते नास्ति ज्वरो नास्त्युष्मणा विना । " असा सामान्य सिद्धांतहि सांगण्यांत आला आहे.
 सदरहू विवेचनामध्ये उत्पन्न होणारी एक शंका अशी आहे कीं, ज्या पाचक पित्ताची उन्मार्गावस्था ज्वरोत्पादक ह्मणून सांगण्यांत आली आहे ते पित्त उम्मार्गावस्थेत येण्यासारखे आहे काय ? शिवाय या