पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 पित्ताचे स्थान आमाशय किंवा लहान आतडें हैं आहे काय ? कारण, पाचक पित्ताचे वर्णनांत त्याचे स्वरूप द्रवत्वविरहित केवळ पाक्वादि कार्यानुमेय उष्णता असे असून स्थान हैं पक्वाशय व आमाशय यांचा मध्यभाग म्हणजे लहान आतडे आणि मोठें आंतडें यांचा मध्यभाग अर्थात् ग्रहणी हे सांगण्यात आले आहे.

पित्तं पंचात्मकं तत्र पक्कामाशयमध्यगं ।
पंचभूतात्मकत्वेपि यत्तैजसगुणोदयात् ॥ १ ॥
त्यक्तद्रवत्वं पाकादिकर्मणाऽनलशाद्वतं ।
पचत्यन्नं विभजते सारकिट्टौ पृथक्तथा ॥ २ ॥

 अर्थ-- पांच पित्तांपैकी पाचक पित्त पक्वाशय व आमाशय यांचेमध्ये असून ते पंचभूतात्मक असतांहि तैजसगुणाचे अधिक्यामुळे ज्यांत द्रव नाही असे व अन्नपचनादि कार्यावरून ज्याला अग्नि नांव आहे असे असून तें पित्त अन्न पचवितें, सारकिट्टांचें पृथक्करण करतें इत्यादि. (अ. हृ.सू. )

 हा पक्काशय व आमाशय यांचा मध्यभाग म्हणजे ग्रहणी होय.

अन्नस्य पक्त्या पित्तं तु पाचकाख्यं पुरेरितं ।
दोषधातुमलादीनामूष्मेत्यात्रेयशासनं ॥ १ ॥
तदधिष्ठानमन्नस्य गृहाणात् ग्रहणी मता ।
सैव धन्वंतरिमते कला पित्तधराव्हया ॥ २ ॥
आयुरारोग्यवीर्याजो भूतधात्वाग्निपुष्टये ।
स्थिता पक्काशयद्वारिर भुक्तमार्गीर्गलेव सा ॥ ३ ॥

 अर्थः--पूर्वी अन्नाचे पचन करणारें जें पित्त सांगितले त्यालाच आत्रेय दोषधातुमलांचा ऊष्मा म्हणतात. (आत्रेय, चरक.) त्या उष्म्याचे स्थान आणि अन्नाचें ग्रहण करणारी ती ग्रहणी होय. याच ग्रहणीला धन्वंतरीचे (सुश्रुत ग्रंथ ) मताने पित्तधरा कला नांव आहे. ती पक्वाशयाचे द्वारावर अन्नमागांतील अडसराप्रमाणे आहे. या वर्णनावरून अग्नी किंवा पाचकाग्नि याचें स्थान लहान आंतर्डे (अ.हृ.शा.) नसून ग्रहणी आहे हे उघड झाले. ( सर्व लध्वंत्राला ग्रहणी मानणे ही गोष्ट आयुर्वेदाला संमत नाहीं. ) मग आंतड्यांतील पित्त कोणते ? व त्याचा पचनाशी काय संबंध ? ( याविषयीं पित्ताचे वर्णनांतील रंजक पित्ताचें वर्णन ध्यानी ठेवावे. ) पित्ताचे वर्णनामध्ये आंतड्यांमध्ये जे पित्त आहे त्याचा उल्लेख रंजक या नांवानें आहे. मात्र रंजकशब्दाने अन्नाचें रंजक व अन्नरसाचें रंजक हा भेद ध्यानीं ध्यावयास पाहिजे. आमाशय या शब्दाची व्याप्ति आम अन्न, आम रस, व आम धातु यां-