पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहाल्य, वाई
१७१
( १ ) ज्वर

 पर्यंत असल्याचा उल्लेख आमाचे विवेचनांत केला आहे. अन्नपचनाचे कार्य ग्रहणीमध्ये पूर्ण होतें म्हणजे अन्नांतून शरीरोपयुक्त असा रस व निःसत्व मलभाग यांचे पृथक्करण या ठिकाणीं होतें म्हणून तत्वतः याच भागाला पाचकाग्नीचे अधिष्ठान मानणे योग्य. दुसरे पक्षी चर्वणापासूनच पचनाला सुरवात होते असे म्हणावयास प्रत्यवाय नाहीं. पचनाचे मुख्य वर्ग अगर पोटभेद करावयाचे झाल्यास सोप्या भाषेत असे करतां येतील कीं; तोंडांत चर्वण - बारीक करणे, आमाशय - अन्नाशय यांत सर्व अन्नाचें एकत्र पातळ मिश्रण करणे, नंतर या पातळ मिश्रणामध्ये लहान आतड्यांत - ( पच्यमान आशयांत ) पित्ताचे मिश्रण होऊन एक प्रकारें रासायनिक पद्धतीने शिजण्याची क्रिया करणें व नंतर ग्रहणीमध्ये पृथक्करण-गाळण्याची क्रिया पूर्ण होणे, असे पाडतां येतील. चावणें - बारीक करणें, मिसळणे, शिजविणें आणि गाळणे या चार अवस्थांतरांपैकीं मुख्य क्रिया गाळण्याची ती ग्रहणीत होते. पाचक शब्दाचा स्पष्ट अर्थ, पचविणे, आत्मसात् करणे अर्थात् एकादा विजातीय भाग कादून टाकून सजातीय घेणें अर्थात् पृथ्थकरण असा होता हैं ध्यानांत ठेवणें अगत्य होय. त्यापूर्वी पित्त अन्नांत मिश्र होऊन जें शिजण्याचें कार्य घडतें तें पित्त आंतड्यांतून स्रवणारें असतें. याच कार्याला यत्कृतांतून पित्तवाही नलिकेच्या द्वारे येणाऱ्या पित्ताची अवश्यकता असते हि उघड आहे. परंतु, आंतड्यांतील पित्त हेंच मुख्य असून त्याला मदत यकृतांतील पित्ताची असते. (प्रस्तुत लेखकाला या दोन पित्तांचे रासायनिक पृथक्करणाची नक्की माहिती नाही तरी आंतड्यांचा दाह व भेदन - जुलाब-हें कार्य आतडयांतील पित्ताचें दिसतें यावरून असें अनुमान करणें अयोग्य वाटत नाहीं कीं, तीक्ष्ण-भेदी- असलें पित्त हैं आंतड्यांतील असून या तीक्ष्ण गुणाला मर्यादित करणारें पित्त हैं यकृतांतील पित्त असावें अन्नाचे घटक फोडून - विरळ करून त्यांतील सूक्ष्म भाग वेगळे करण्याला त्यां तीक्ष्ण भेदी असल्या एकाद्या पदार्थाची अवश्यकता आहे तोच पदार्थ है आंतड्यांतील पित्त होय ) हैं पित्तच पचनाचें कार्य करते यामुळे त्याला पाचक नांवानें संबोधणें अयोग्य नाहीं. हें द्रव - प्रवाही आहे. अर्थात् याची उन्मार्गप्रवृत्ति होणे संभवनीय असतें. ( संस्कृत भाषेतील धातूंच्या बव्हर्थानें असे अर्थ पुष्कळ ठिकाणी स्विकारले जातात. ) व हेंच पित्त म्हणजे ज्वलन किंवा अग्नि. त्याला दोष बाहेर काढतात याचा अर्थ त्या पित्ताचा अंतस्राव बंद करून अंतर्वाहि स्रोतसांऐवजीं बहिर्वाही जी रसवह स्रोतसे त्या विरुद्ध मार्गाकडे त्याची प्रवृत्ति होते. म्हणून पित्ताची उन्मार्गगामिता अथवा कोप हा ज्वरोत्पादक होय. अन्नरसाचें पृथक्करण ग्रहणीप्रदेशांत होत असले तरी सर्व आंतड्यांतूनहि सक्षम स्रोतसांतून तो