पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७३
( १ ) ज्वर

 त्यामुळे वाढलेली उष्णता ज्वररूपाने तापदायक होते. स्वेदावरोध हैं प्रमुख ज्वराचें लक्षण याच उद्देशाने सांगितले आहे.

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावतां ॥
यत्र संगः स्ववैगुण्याद्व्याधिस्तत्रोपजायते ॥ १ ॥

 याचा तात्पर्यार्थ हाच होय. घामाचे वियोजनाला व्यत्यय झाल्या- शिवाय ज्वर नाहीं व घाम येऊ लागतांच ज्वर नष्ट होतो, या निदानांतील उल्लेखांचा तात्पर्यार्थ याच धोरणाला अनुलक्षून आहे. सदर संप्राप्तीचा थोडक्यांत तात्पर्यार्थ असा होतो.
 " आमाशय - लहान आंतडीं अथवा पच्यमानाशय यांतील उन्मार्गगामी पित्ताचा त्वचा अगर स्वेदवाहिनींमध्ये होणारा स्थानसंश्रय किंवा संग म्हणजे वर होय. "
 आंतड्यांतील पित्ताचें, व त्वचेतील पित्ताचें कार्य ध्यानीं घेऊन सदर संप्राप्ती वाचल्यास हा अर्थ उघड होणे कठीण नाहीं. या संप्राप्तीचें निरीक्षण केल्यास निदानशास्त्रांतील कांहीं ठळक तत्वांचा सहज बोध होण्यासारखा आहे. ती तत्वें अशीं कीं. -
 १ केवळ, क्षीणता अथवा वृद्धि रोगकारक नाहीं.
  २ उन्मार्गप्रवृत्तिच रोगकारक असते.
 ३ उन्मार्गप्रवृत्तीला संचयाची अवश्यकता असते.
 ४ केवळ उन्मार्गप्रवृत्ति अथवा कोपाहि रोगकारक नसून कुपित दोषाला अडथळा होणें रोग होय.
 ५ उन्मार्गवस्था हैं रोगाचें आरंभस्थान.
 ६ उन्मार्गगामी दोषाचें संग्रहस्थान हैं रोगाचे स्थान.
 ७ उन्मार्गगामिता अथवा उन्मार्गी दोषाचा स्थानसंश्रय यांना कारण स्रोतोरोध हें आहे.
 ८ म्हणून संग - अवरोध- अडथळा हे रोगाचे मुख्यत्वें व सर्वसामान्य कारण ठरते.
 ९ आयुर्वेदांत,

रसः सज्जति यत्रसः ।
तस्मिन्विकारं कुरुते ॥ ( अ. हृ, )
यत्र संगः स्ववैगुण्यात् व्याधिस्तत्रोपजायते ॥

 जेथे थांबतो तेथे रोग. जेथे संग तेथें रोग ही सिद्धांतवाक्यें सांगितली आहेत.
 १० संगानें किंवा उत्सर्जनातील अडथळ्याने अनुतवर्जित द्रव्याचा- दोषाचा संचय - वृद्धि - होते. अर्थात् वाढीशिवाय रोग नाहीं.