पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४
आयुर्वेदातील मूलतत्वें.

  ११ वाढ, कोप, प्रसार व स्थानाश्रय आणि मग रोग, रोगाची स्पष्टता व भेद असा क्रम सुचविणारें सुश्रुतांतील वाक्य:--

संचयंच प्रकोपंच प्रसरं स्थानसंश्रयम् ।
व्यक्ति भेदं च यो वेत्ति दोषाणां सभवेत् भिषक् ॥

  हैं निदानशास्त्रांतील आदर्शवाक्य आहे.

 त्रिदोषविषयक सर्वसामान्य उपपत्तीनें ज्वराची संप्राप्ति ठरली व तिनें सामान्यतः ज्वरज्ञान ह्मणजे कोणत्या प्रकारची विकृति याचा वरीलप्रमाणें बोध झाला, मग पुनः त्यांत पोटभेद व वातादींचा संबंध कोणती स्पष्टता दाखवितो हा विचार उत्पन्न होतो.
 याविषयीहि त्रिदोपकल्पनेचा उत्तम उपयोग होतो. स्वराविषयीं वरील खुलासा ध्यानी घेतल्यावर दोन गोष्टी निश्चित होतात त्या या की, वर म्हणतांच (आयुर्वेदाचे मतानुसार ) स्वेदवाही अशी त्वचेंतील व पच्यमानाशयांतील पित्तवाहि स्रोतसे दुष्ट- अवरुद्ध झालेलीं असतात आणि आतड्यांत पित्त कमी होऊन त्वचेत वाढ झालेली असते. (रोगस्तु दोषवैषम्यं, या सूत्राचा अर्थ केवळ न्यूनाधिक्य नसून क्रियावैषम्य याचा या उदाहरणावरून नीट खुलासा होईल.) ) पित्त उत्पादक ही गोष्ट या प्रमाणे उघड असते. त्यानंतर ज्या पित्ताची उन्मार्गावस्था झालेली व ती होण्याला आंतड्यांतील स्रोतोनिरोध कारण असतो; त्या पित्ताची आणि स्रोतसांची अवस्थांतरें ध्यानी येणे अगत्य असतें. कारण या पित्ताच्या यथामार्गप्रवृत्तीचे उपाय ह्मणजे चिकित्सा असून तिचें धोरण एरवी ठरवितां यावयाचें नाहीं. याकरितां पुनः विचार असा करावा लागतो कीं, हें उन्मार्गप्रवृत्त पित्त वाढलेले आहे, क्षीण आहे की समावस्थेतील आहे ? ( स्रोतोरोध झाल्यावर होणारा संचय वेगळा ) याच अवस्था त्रिदोषांच्या पोटभेदांनी दाखविल्या जातात. श्लैष्मक ज्वर म्हणजे कफाची वाढ होऊन आलेला ज्वर अर्थात् कफाची वाढ झाली त्यावेळी तत्वतः पित्ताची क्षीणता व क्षीण पित्ताची उन्मार्गावस्था; पित्तजन्य ज्वर म्हणजे पित्ताची वाढ व वाढलेल्या पित्ताची उन्मार्गावस्था आणि वातज्वरांत तत्वतः पित्ताची वाढ अथवा क्षय नसून त्याचे योग्य प्रमाण कायम असतें. या पित्ताच्या अवस्थांमध्ये स्रोतोरोध होऊ शकतो. तोहि निरनिराळ्या प्रकारांनी होतो. कफ वाढतो त्यावेळी स्रोतसांमध्यें अभिष्यंद-ओलसरपणा वाढतो. पित्त वाढते त्यावेळी फाजील दाहाचा परिणाम सहन न होऊन स्रोतसे उद्विग्न व संकुचित होतात. व वायु वाढतो त्यावेळीं रूक्षतेमुळे स्रोतसांचा संकोच होतो. आंतड्यांत पित्ताचा स्राव न होतां अन्नाचें अजीर्ण, स्रोतसांचा संकोच व पित्ताची उन्मार्गप्रवृत्ति हैं