पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७५
( १ ) ज्वर

 एकच कार्य या तीन प्रकारांनी होते. अन्नरसामार्फत हेच गुण स्वेदवाही अशा त्वचेंतील स्रोतसांतहि प्रसार पावतात. व त्यांमध्ये कफ, पित्त व वायु यांचे अनुक्रमें अभिष्यंद दाह, आणि रुक्षता हे गुण उत्पन्न होतात. कोणत्याहि दोषाची वाढ, क्षीणता व साम्य या अवस्था चरकांतः -

'क्षर्यस्थानं च वृद्धिश्च दोषाणां त्रिविधा गतिः ॥

 ( अर्थ: - क्षय, साम्य (स्थान) आणि वाढ अशीं दोषचीं तीन प्रकारची गति आहे. ) या वाक्याने सांगितली आहे. चिकित्सेचे वेळीं या पोटभेदांना अनुसरून, कफपित्तानिलांवर अनुक्रमें, क्षोभक-तीक्ष्ण- शामक -मंद व स्वेदन- स्निग्धोष्ण अशा उपायांची योजना केलेली असते. याच भेदांवरून ज्वराची मुदत व तीव्रताहि ठरवितां येते. कफासारखे घनद्रव्य आणि उष्णतेचा अभाव यामुळे ज्वराची मुदत अधिक पण पित्त कमी म्हणून तापाची तीव्रता कमी. पित्त जात्या तीक्ष्ण म्हणून त्याची मुदत त्याहून कमी पण ज्वराची तीव्रता अधिक आणि वायूचे वेळीं पित्त प्रमाणांत व केवळ रूक्षता यामुळे मुद्दत कमी आणि तापाचे प्रमाण मध्यम अशी व्यवस्था सहज करतां येऊन शारीरविकृतीचा सूक्ष्म भेद अगदी स्पष्ट होतो. व त्रिदोषांची निदानशास्त्रांतील योजना बोधदायक आणि पूर्ण शास्त्रीय अशी ठरते. एक दोषी पोटभेदाप्रमाणे द्विदोषी अथवा सांन्निपातिक भेदहि अधिक स्पष्टतेसाठीं आहेत. सृष्टोतील पदार्थांमध्ये अनेक विचित्र गुण असल्याकारणाने एकाच वेळी दोन अथवा तीन अशा दोषांचे वाढीला अवसर मिळतो. मात्र ही वाढ सर्वांगीण किंवा परस्पर विरुद्ध गुणांची होत नाहीं. जसें, कफ व पित्त यांमध्ये उष्ण व शीत अशी विरोधी गुणांची वाढ संभवनीय नाहीं तरी स्निग्ध व तीक्ष्ण ही संभाव्य असते, तूप, स्निग्ध एकटया स्निग्धगुणाची वाढ करते; पण तेल स्निग्धता उत्पन्न करते ती दाहक असते. रूक्ष व तीक्ष्ण या दोन गुणांची वाढ होऊं शकते. व १ अभिष्यंद + दाह = कफपित्त २ रुक्षता अधिक दाह = वातपित्त असे संसर्गजन्य पोटभेद उद्भवतात. ३रा प्रकार कफवात हा आहे. हा प्रकार थोडा भानगडीचा आहे. तो असा कीं, कफाचा शीत हा गुण वाढला आणि त्यामुळे वायूचाही शीत गुण वाढला अर्थातच यामुळे प्रत्येक संवेदनात्मक कार्यामध्ये न्यून्यत्व संभवतें व त्याचा परिणाम संवेदनेचे अभावी हालचाल कमी व त्यायोगे अभिसरण अथवा स्राव कमी. मात्र यामध्ये ध्यानी ठेवावयाचें असतें तें हैं कीं, वायूचा गतिधर्म वाढून रोग होत नाहीं. कारण अडथळा म्हणजे रोग हा मूल सिद्धान्त आहे. त्याचे क्रियेत व्यत्यय येतो व