पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७७
अंतीसार

 द्योतक असून ज्वरासारख्या सर्वांगीण विकारांत त्याचे तारतम्य तार्किक बुद्धीनें ध्यानी येण्यासारखे असतें. एकांगी विकारांत या पोटभेदांचा संभव असत नाहीं. शरीरांत एकादा विकार निर्माण होतो त्यावेळी त्यामुळे निरनिराळ्या भागांवर जी लक्षणे उत्पन्न होतात त्यांचा कमी अधिकपणा कांहीं तरी अन्य कारणाने ते ते शरीरभाग आधी दूषित झालेले असतात हे आहे. व त्या दूषित भागांवर अधिक परिणाम होतो.

स एव कुपितो दोषः समुत्थानविशेषतः ॥
स्थानांतराणि च प्राप्य विकारान् कुरुते बहुन् ॥ १ ॥


 तोच कुपित झालेला दोष कांहीं अन्य कारणानें भिन्न भिन्न स्थानांत प्राप्त होउन अनेक विकार उत्पन्न करतो.(अ० हृ० )
 अशा प्रकारें रोगनिदानामध्ये रोगकारक शारीरविकृति व तिचे सूक्ष्म पोटभेद त्रिदोषांच्या सूक्ष्म तारतम्यज्ञानानें ओळखण्याची आयु र्वेदीय पद्धति असून त्रिदोषांचें तात्विक स्वरूप व भेद यांचा नीट विचार केला असतां ती कठीण वाटली तरी अव्यवहार्य नाहीं हें ध्यानीं येईल.

_________
[२] अतीसार ( आणखी एक उदाहरण. )


  अतीसाराविषयीं आयुर्वेदाचा खुलासा येणेप्रमाणे आहे:--
संशम्यापां धातुरग्निं प्रवृद्धः शकृन्मिश्रो वायुनाधः प्रणुन्नः ॥

सरत्यतीवातिसारं तमाहुर्व्यार्थि घोरं षडविधं तं वदति ॥ २ ॥ (मा नि)

कुपितोऽनिलः
विस्रंसयत्यचोधातुं हत्वा तेनैव चानलं ।
व्याप्यधानु शकृत्कोंष्ठं पुरीषं द्रवतां नयन् ॥१॥
प्रकल्पतेऽतिसाराय ॥

वाग्भट

 अर्थ :-- वाढलेला अपू धातु ( शरीरांतील सर्व प्रवाही पदार्थ असा अर्थ टीकाकारांनी केला आहे. ' अपां धातुरित्यनेन रसजलस्वेद मूत्रादयो ग्राह्याः, असे मधुकोश व्याख्येंत आहे. ) म्हणजे पाणी किंवा जलांश अग्नि मंद करून तो मळांत मिश्र होतो व वायुकडून खालीं फेंकला जाणारा असा अधिक प्रामाणांत सरतो त्याला अतीसार म्हणतात. ( मा. नि.)< br>  कुपित झालेला ( वाढलेला ) वायु जलांशाला खाली (गुदमार्गाकडे)