पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 फेंकतो. याच वाढलेल्या जलांशानें अग्निमांद्य उत्पन्न करतो, कोठा आणि मळ दूषित करतो व मळाला पातळपणा आणून अतीसार उत्पन्न करतो. (अ.हृ.)
 तात्पर्य, अतीसार कां व कसा होतो याचा खुलासा, जलांशाची कोठयांत म्हणजे ( प्रकरणानुसार ) लघ्वंत्र किंवा पच्यमानाशयांत वाढ होते त्यामुळे अग्निमांद्य होतें, मळांत अधिक पातळपणा उत्पन्न होतो व या सर्व कारणांनी कुपित झालेला वायु या मलमिश्र वाढलेल्या अपघतूला गुदमार्गानें उत्सर्जित करतो .अधिक पातळ आणि अधिक प्रमाणांतील मळाचें (सरण) वाहणं म्हणजे अतीसार होय. ( गुदेन बहुद्र व सरणमतीसार :- मधुकोश व्याख्याः गुदद्वारानें पुष्कळ द्रवाचा स्त्राव म्हणजे अतिसार. ) या संप्राप्तीमध्ये चय प्रकोप आणि स्थानाश्रय कसे व कोणत्या दोषाचे संभवतात पाहू ?
 अतीसार हा विकार म्हणजे जुलाब अधिक होणें. व तो मळ नित्याप्रमाणे नसून त्यांत फाजील जलांश असणें. हा जलांश कोठें संभवतो व तो नित्य नसतो. नित्याचे मलोत्सर्जन मर्यादित असून माळांतहि विशिष्ट प्रमाणांत घनता असते. मळाबरोबर येणारा जलांश किंवा द्रव पदार्थ कोठें संभवेल. पक्वाशय किंवा मोठे आतडें यांत जलांश नाहीं. यांत जो मळ येतो तो घनस्वरूप पावून येत असतो. आणि लहान आतड्यांत अन्नाशयांतून जे अन्न येतें तें पातळ होऊन येत असतें. आहारांत घन व द्रव असे दोन मुख्य प्रकार त्या सर्वांचें प्रवाही मिश्रण आमाशयांत-अन्नाशयांत होऊन तें सर्व लध्वंत्रांत - पच्यमानाशयांत येते व मळ घनस्वरूपाचा पक्वाशयांत मोठ्या आतड्यांत येतो म्हणजे द्रव अशा आहारांतील जलांशाचे वियोजन लहान आतड्यांतून होते ही गोष्ट उघड होते. लघ्वंत्रांतील पचनक्रिया होऊन त्यांतील अभिष्यंदि - पाझरणाऱ्या स्रोतसांतून अन्नरस पाझरतो. टाकाऊ धनभाग पक्वाशयांत व टाकाऊ द्रव भाग या भागांतील स्रोतसांतून पाझरून उदरांतील अभिवाही-अभिष्यंदि - अशा स्रोतसांचे द्वारें मूत्राशयांत सांठविला जातो व अशा रितीनें मलस्वरूपी द्रवांश व साररूपी रस हे पातळ पदार्थ अन्नांतून वियुक्त झाले की घन असा टाकाऊ भाग शिल्लक राहतो. येथें मूत्रवियोजनासंबंधी थोडा फार मतभेद भासण्याचा संभव आहे. तो असा की, मूत्रवाहिनी दोन नलिका वृक्कांतून ( मूत्रपिंडांतून ) मूत्राशयाकडे ( प्रत्येकी एकेक ) येऊन त्यांयोगे मूत्र वस्तीमध्ये मूत्राशयामध्ये - सांठते असे प्रत्यक्ष दृष्ट आहे. व यावरून वृक्कांना मूत्रपिंड असे नांव सध्यां प्रचारांतहि आहे. मूत्रोत्पादन क्रिया वृक्कांत होते असा सिद्धांतहि यावरून प्रस्थापित केला जातो. आयुर्वेदांत या दोन वाहिनी मानल्या-सांगितल्या असूनही त्यांशिवाय आणखी..