पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७९
अतीसार



अधोमुखोपि वस्तिर्हि सूत्रवाहिशिरामुखैः ।
पाश्चेंभ्यः पूर्यते सूक्ष्मैः स्यंदमानैरनारतं ॥ १ ॥ (अ. ह. निदान )


  मूत्राशय अधोमुख असूनहि त्याचे पार्श्वभागावर (सर्व आजूबाजूला) असलेल्या व निरंतर पाझरणाऱ्या सूक्ष्म स्रोतसाचे द्वारें तो भरतो, असा उल्लेख आहे. म्हणजे मूत्राशयांत संचित होणारा जलांश हा एकटा वृक्कांतील नसून आणखीहि पाझरणाऱ्या स्रोतसांतून त्याचा संचय होतो हें आयुर्वेदाचें मत आहे. ( याविषयींच मतभेद ) अतीसाराची आयुर्वेदीय संप्राप्ती वाचीत असतां या मताचा विचार अपरिहार्य आहे. अन्नांतील द्रवांश जातो कोठें व कसा हा या विषयांतील महत्वाचे मुद्याचा प्रश्न आहे. त्याचें आंतड्यांतील सूक्ष्म अशा बहिर्मार्गी स्रोतसांकडून वियोजन होण्या सारखी योजना नसेल तर हा जलांश रसाबरोबर सर्व शरीरभर प्रसार पावावा लागेल. आणि अशा प्रकारची योजना निसर्गाला योग्य दिसत नाहीं. शुद्ध व पोषक अन्नरसामध्ये अशुद्ध व मलस्वरूपाचा द्रव - जलांश मिश्र असणें संभाव्य नाही. हा द्रवांश पच्यमानाशयाच्या अभिष्यंदि स्रोतोमार्गाने उदराच्या आवरणांतून मूत्राशयामध्यें पाझरतो हीच कल्पना व्यवहार्य आहे. वृक्कांतून जें मूत्र मूत्रवाहिनीचे द्वारे (द्वेगवीन्यी) मूत्राशयांत येते तो रक्तांतील पचनक्रियेनंतर मलस्वरूप पावणारा जलांश होय. अशा प्रकारची आयुर्वेदाची कल्पना आहे. असो. अशाप्रकारें अन्नांतून जो जलांश अंतर्गत स्रोतसांचे द्वारें पाझरून जावयाचा तो त्या स्रोतसांचा अवरोध झाला असतां योग्य रीतीने पाझरत नाही. व त्याची वाढ होऊन तो परत अन्नांत येतो. व अन्नपचनाचे अभावी त्यांतील द्रवांशाचे शोषण होत नाहीं यामुळे अन्नांत जलांशाचे प्रमाण वाढते व तें अधिक पातळ होते. ह्मणजे वाढ जलांशाची व जलवाही स्रोतसांचा अवरोध या गोष्टी उघड झाल्या. अशा प्रकारें आंतड्याचा अंतर्भाग व सूक्ष्म स्रोतसे भरून गेली कीं वायूचे संचाराला व्यत्यय येतो. पच्यमानाशयाची जी हालचाल- वळवळ - चालते ती त्यांतील स्रोतसांत भरून राहणाऱ्या वायूमुळे चालते. याच वायूला समानवायु हें नांव आहे. ( समान वायु वर्णन. पृ. ८३ पहा. ) मग अशा रीतीनें रुद्ध झालेल्या वायूचा क्षोभ होऊन तो या आंतडयाची गति वाढवितो व या द्रवीभूत अन्नाला किंवा मळाला जोराने खाली फेंकण्याची क्रिया सुरू होते. हा वायूचा क्षोभ ह्मणजेच कोप होय. यांत वाढ जलांशाची व कोप वायूचा असतो. पच्यमानाशयांतील कार्य व स्थानानुरूप तेथील दोषांचे कार्य ध्यानीं घेतलें असतां ही कल्पना पटेल. निदानांतील दोषांचा संबंध रोगस्थानाचे कार्य ध्यानांत आणून ठरवावा लागतो. फाजील संचय