पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 व कोप हे कोणत्याही विकारांत पाहिजेतच. अतीसारांत कुपित वायूचा कोप वायु तत्वतः वाढून होत नाहीं तो वाढलेल्या जलांशाने मार्गरोध होऊन होतो. वायूचा कोप मार्गावरोधामुळे होत असल्याचा उल्लेख अनेकवार आला आहे.

( वायोर्धातुक्षयात् कोपा मार्गस्यावरणेन च । )

 ज्वरांत पित्तप्रवाही अंतर्मुख स्रोतसांचा अवरोध होतो तर अतिसारांत तो जलवाही - ( क्वचित् रसवाही ) अशा बहिर्मुख स्रोतसांचा होतो. अतीसाराचें कार्य घडण्याला आणखी स्रोतोरुद्ध वायूची मदत लागते.
 अशा रीतीने होणाऱ्या अतीसारामध्यें त्रिदोषानुरूप पोटभेद हे मागील ज्वरांत सांगितल्याप्रमाणेच संभवतात. जलांशाची वाढ होऊन ह्मणजे अभिष्यंदि पदार्थांनीं तत्वतः वाढ होऊन होणारा कफातीसार, आंतड्यांत दाहक पदार्थांच्या सहवासाने दाहात्मक क्षोभ होऊन जलांशाचे वियोजन न होतां होणारा पित्तातिसार आणि जलांशाची वाढ नाहीं पण रुक्षता वाढून त्यामुळे स्रोतः संकोच झाला व वियोजन झाले नाहीं त्यामुळे तात्कालिक व स्थानी वाढ यामुळे होणारा वातातिसार असे तीन पोटभेद ! द्वंद्वजन्य आणि संन्निपातजन्य हे भेद यांत फारसे महत्वाचे नाहींत तरी ते ज्वरांत सांगितल्याप्रमाणेंच ठरवावयाचे.
 वातादि भेदांवरून अनुक्रमें, रूक्षताजन्य स्रोतः संकोचामुळे, दाहजन्य स्रोतः संकोच मुळे आणि अभिष्यंदजन्य स्रोतः संकोचामुळे हे भेद उत्पन्न होतात अशी व्यवस्था मानली आहे.

___________
(३) उदर.

 उदर रोगाची संप्राप्ति अशी सांगितली आहे. --

रुद्ध्वा स्वेदांबुवाहीनि दोषाः स्रोतांसि संचिताः ॥
प्राणान्यपानान् संदूप्य जनयंत्युदरं नृणां ॥ १ ॥ ( मा. नि. )
ऊर्ध्वाधो धातवो रुध्वा बोहनी रंखुवाहिनीः ॥
प्राणान्यपानान् संदूप्य कुर्यु रत्वड्यासंधिगाः ॥१॥
आध्माप्य कुक्षिमुदरं ॥ ( अ.ह.)

 अर्थ- वाढलेले दोष स्वेद व जलवाही स्रोतसें बंद करून प्राण व अपान वायु आणि जठराग्नि यांना दूषित करून उदर रोग उत्पन्न करितात.( मा. नि. )
 दोष उर्ध्व व अधोभागांतील जलवाहिनी बंद करून प्राण, अपानवायु आणि अग्नि दूषित करून त्वचा व मांस यांतील संधिभागाचा